---Advertisement---

ज्याने पंजाबच्या तोंडून हिसकावला असता सामना, त्याच खेळाडूचे कर्णधार राहुलने गायले खूप गुणगान

On: रविवार, सप्टेंबर 26, 2021 1:21 PM
---Advertisement---

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी (२५ सप्टेंबर) पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला गेला. यामध्ये पंजाब किंग्सने ५ धावांनी विजय मिळवला. सामना संपल्यानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुलने त्याची प्रतिक्रिया देताना सामन्यात मिळालेल्या विजयाचे श्रेय संघाच्या गोलंदाजांनी दिले आहे. राहुल संघाच्या फलंदाजांच्या प्रदर्शनाबाबत आनंदी दिसला नाही आणि त्याने फलंदाजांनी सुनावले आहे. तसेच त्याने हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरचेही त्याने केलेल्या खेळीसाठी कौतुक केले. होल्डरने हैदराबादसाठी तीन विकेट्स आणि ४७ धावांची खेळी केली.

राहुलने दिली प्रतिक्रिया
सामन्यातील विजयानंतर राहुल म्हणाला की, “मला वाटते की, आम्ही खूप मनोरंजक क्रिकेट खेळत आहोत. हे आम्ही मागच्या दोन- तीन वर्षांपासून करतोय. मात्र, मला यावेळी फक्त विजयाशी देणेघेणे आहे. त्याने (होल्डरने) चांगले प्रदर्शन केले. त्याने एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या आणि एका अशा खेळपट्टीवर फलंदाजी केली, जेथे शाॅट खेळणे अवघड होते. आम्ही फलंदाजीमध्ये २०-३० धावा अजून करू इच्छित होतो, पण आम्ही विजय मिळवला. यावरून हा विश्वास मिळतो की, आमचे गोलंदाजही धावसंख्येचा बचाव करू शकतात.”

तो पुढे बोलताना म्हणाला, “शमीने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. त्याने वाॅर्नर आणि विलियम्सन या दोन मोठ्या फलंदाजांना बाद केले. आमच्या फिरकीपटूंसाठी एका लाइन आणि लेंथमध्ये गोलंदाजी करणे सोपे केले. फलंदाजांसाठी धडा हा होता की, ही १६०-१७० धावांची खेळपट्टी नाहीये. मात्र, आम्ही जर काही भागीदारी केल्या असत्या १४०-१५० पर्यंत पोहचू शकलो असतो. हरप्रीत आमच्यासाठी खूप चांगले करत आहे. तो काहीही करू शकतो. त्याने आमच्यासाठी काही सामन्यांचा शेवट केला आहे. त्याच्याकडे एक कंट्राेल आहे आणि क्षेत्ररक्षणातही चांगला आहे. जेव्हाही मी त्याच्या जवळ जातो, तो म्हणतो पाजी! चिंता करू नका, मी धावा नाही देणार. हाच त्याचा स्वभाव आहे.”

पंजाबचा रोमांचक विजय
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांमध्ये १२५ धावा केल्या होत्या. हैदराबादचा संघ १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकांमध्ये सात विकेट्स गमावून १२० धावा करू शकला आणि पाच धावांनी सामना गमावला. हैदराबादच्या जेसन होल्डरने पंजाबचे तीन विकेट्स घेतले आणि फलंदाजी करताना ४७ धावा केल्या. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. पंजाबच्या रवि बिश्नोईने तीन आमि मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या. होल्डरला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सामनावीर निवडले गेले.

महत्त्वाच्या बातम्या-

नामुष्कीजनक पराभवानंतर राजस्थानच्या कर्णधाराने दिले संघ बदलाचे संकेत, म्हणाला…

शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!

युझी जिथे आनंदी आनंद तिथे; सामन्यानंतर चहलचा सीएसकेच्या गोटात फेरफटका, धोनीकडून धडेही घेतले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---