---Advertisement---

आयपीएल २०२१: चेन्नईचा संघ दिसणार नव्या अंदाजात! धोनीने केले नव्या जर्सीचे अनावरण

On: बुधवार, मार्च 24, 2021 9:29 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी तीनवेळच्या चेन्नई सुपर किंग्सने या हंगामासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. त्यामुळे यंदा चेन्नईचा संघ नव्या अंदाजात दिसणार आहे. चेन्नईच्या नव्या जर्सीचे अनावरण चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनीने केले. त्याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

चेन्नईने नव्या जर्सीच्या अनावरणाच्या व्हिडिओला ‘थाला धरिसनम’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच यात धोनी चेन्नईच्या चाहत्यांना शिट्ट्या वाजवण्यास सुरुवात करा, असे सांगतानाही दिसत आहे.

चेन्नईच्या जर्सीत झाले बदल 

चेन्नई सुपर किंग्सची नवी जर्सी नेहमीप्रमाणे पिवळ्या रंगाचीच आहे. तसेच जर्सीच्या खालच्या बाजूला गर्जना करणारा सिंह देखील आहे. पण याबरोबरच जर्सीच्या खांद्यावर केमोफ्लाजचे डिझाईन आहे. तसेच जर्सीच्या पुढच्या बाजूला ‘मिंत्रा (Myntra)’ चा लोगो दिसणार आहे. कारण चेन्नईचे प्रायोजकत्व यंदा मिंत्राकडे आहे.

चेन्नईची आयपीएल २०२१ ची सुरुवात मुंबईतून

खरंतर यंदा कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएलचे आयोजन वेगळ्या प्रकारे करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळा प्रवास करणार आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी होईल. तसेच कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.

त्यामुळे यंदा चेन्नई संघाचे पहिले ५ सामने मुंबईत होणार आहेत. त्यानंतर चेन्नई साखळी फेरीतील पुढील सामने दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता येथे खेळणार आहे. चेन्नईचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.

चेन्नईची आयपीएल २०२०मध्ये निराशाजनक कामगिरी –

चेन्नई सुपर किंग्सची आयपीएलच्या १३ व्या हंगामात खुपच निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यांना १४ मधील केवळ ६ विजयांसह गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळे यंदा मात्र चेन्नईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

आयपीएल लिलावात या खेळाडूंना केले खरेदी 

चेन्नईने आयपीएल २०२१ च्या लिलावात ६ खेळाडूंना खरेदी केले आहे. यात इंग्लंडचा मोईन अली, भारताचे कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, के भगत वर्मा, सी हरी निशांत आणि एम हरिशंकर रेड्डी यांना खरेदी केले आहे.

आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ –

एमएस धोनी (कर्णधार) , फाफ डू प्लेसीस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, एन जगदीशन, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, आर साई किशोर, मिचेल सँटनर, इम्रान ताहिर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी, जोश हेजलवुड, केएम आसिफ, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरी निशांत.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाचा सामना पाहायला थेट डोंगरावर चढलेला सुधीर चौधरी आहे तरी कोण? जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी

‘घरासमोर क्रिकेट खेळू नका’, असं बोलल्याच्या रागातून पुण्यात टोळक्याचा कुटूंबावर हल्ला

याला म्हणतात क्रिकेटप्रेम! भारत विरुद्ध इंग्लंड वनडे टीम इंडियाच्या कट्टर चाहत्याने पाहिला डोंगरावरुन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---