---Advertisement---

‘घरासमोर क्रिकेट खेळू नका’, असं बोलल्याच्या रागातून पुण्यात टोळक्याचा कुटूंबावर हल्ला

On: बुधवार, मार्च 24, 2021 8:16 PM
---Advertisement---

पुणे। क्रिकेट हा खेळ जेवढा चाहत्यांना आनंद देणारा असतो, तसेच काही गुन्हेही क्रिकेटमुळे घडताना दिसतात. नुकतेच पुण्यातील हडपसर भागात असाच एक मोठा गुन्हा घडला आहे. घरासमोर क्रिकेट खेळू नका असं सांगण्याचा राग आल्याने एका ४० वर्षीय महिलेला, तिच्या नवऱ्याला आणि मुलाला मारहाण केल्याचा गुन्हा ९ जणांवर दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवारी (२१ मार्च) हडपसरमधील रामटेकडी भागात घडली. मारहाण करण्यात आलेल्या महिलेचा नवरा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ९ जणांपैकी एकाच्या घरी गेला होते. त्यावेळी त्यांनी त्याच्या पालकांकडे घरासमोर क्रिकेट खेळल्याबद्दल तक्रार केली होती.

याबद्दलचा राग त्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाच्या मनात होता. त्यामुळे त्या रागाच्या भरात एका गटाने रामटेकडी भागातील सुनील सायकल मार्ट जवळ लाथा, बॅट, स्टंप, लाकडी दांड्या आणि विटांनी ४० वर्षीय महिलेला, तिच्या नवऱ्याला आणि मुलाला मारहाण केली. या मारहाणीत या तीन जणांना गंभीर दुखापती झाल्या. त्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या मारहाणीच्या प्रकरणाची तक्रार करताना महिलेने या मारहाणीत तिची सोन्याची अंगठी हरवल्याचीही तक्रार केली आहे. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), दंगा, ३३६,४२७,५०६ (गुन्हेगारी धमकी), ५०४(शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) यासह फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम कलम ७(१) नुसार वानोवरी पोलिस स्टेशननुसार तक्रार करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

याला म्हणतात क्रिकेटप्रेम! भारत विरुद्ध इंग्लंड वनडे टीम इंडियाच्या कट्टर चाहत्याने पाहिला डोंगरावरुन

कोहलीच्या ‘त्या’ लाल टी-शर्टमागील रहस्य काय? चाहते लावतायेत मजेदार तर्क

शिट्टी वाजवा मुंबई, आम्ही येतोय! पुण्याच्या ऋतुराजकडून मराठीचे धडे घेत चेन्नईकर मुंबईत खेळण्यासाठी सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---