---Advertisement---

कोहलीच्या ‘त्या’ लाल टी-शर्टमागील रहस्य काय? चाहते लावतायेत मजेदार तर्क

On: बुधवार, मार्च 24, 2021 6:28 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला वनडे सामना काल पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडला ६६ धावांनी धूळ चारली. तसेच या विजयासह पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी देखील घेतली.

या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकवून भारताच्या विजयात खारीचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात ६० चेंडूत ५६ धावांची खेळी केली. मात्र आता सामन्यानंतर एका वेगळ्याच कारणाबद्दल कोहलीची चर्चा होते आहे. या सामन्यात कोहलीने घातलेल्या एका टी-शर्ट बद्दल सोशल मिडीयावर चर्चा होते आहे.

गेल्या काही सामन्यात घातलाय टी-शर्ट
भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या एका खास गोष्टीने गेले काही दिवस झाले, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील काही सामन्यात विराट कोहली भारतीय संघाच्या टी-शर्टच्या आत एक लाल रंगाचा टी-शर्ट घालत असल्याचे दिसून आले आहे. काही चाहत्यांचे मते ही लक फॅक्टर मुळे अमलात आलेली कल्पना आहे, तर काहींनी अजून काही तर्क लावले आहेत.

चाहत्यांच्या गमतीशीर प्रतिक्रिया
विराट कोहलीने हा टी-शर्ट घालण्यामागे नक्की काय कारण आहे, हे अद्याप समोर आले नाहिये. मात्र चाहत्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी ही विराट कोहलीची फॉर्ममध्ये परत येण्याची युक्ती आहे, असे म्हंटले आहे. तर काहींनी हा टी-शर्ट विराटला छान दिसत असून नेहमी घालण्याचा सल्लाही दिला आहे.

https://twitter.com/rishu_1809/status/1374298686352543745?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1374298686352543745%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fcricket%2Findia-vs-england-odi-series-virat-kohli-red-t-shirt-photo-viral%2F871766

https://twitter.com/asIam_as/status/1374269578788794372?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1374269578788794372%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fcricket%2Findia-vs-england-odi-series-virat-kohli-red-t-shirt-photo-viral%2F871766

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1374294133901119489?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1374294133901119489%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fcricket%2Findia-vs-england-odi-series-virat-kohli-red-t-shirt-photo-viral%2F871766

दरम्यान, कोहलीच्या फॉर्म बद्दल चर्चा कारण म्हणजे मागील बर्‍याच काळात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. मात्र इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याने आपला फॉर्म परत मिळवला. या टी२० मालिकेत त्याने सर्वाधिक म्हणजे २३१ धावा काढल्या होत्या. आता हाच फॉर्म वनडे मालिकेतही कायम ठेवत भारताला वनडे मालिकाही जिंकवून देण्याचा कोहलीचा प्रयत्न असेल.

महत्वाच्या बातम्या:

ब्रेकिंग! श्रेयस अय्यर दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर

पदार्पणातील दमदार कामगिरीने प्रसिद्ध कृष्णावर कौतुकाचा वर्षाव, या दिग्गजांनी थोपटली पाठ

दुसर्‍या वनडे सामन्यात रोहितच्या जागी मिळणार या खेळाडूला संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---