---Advertisement---

शिट्टी वाजवा मुंबई, आम्ही येतोय! पुण्याच्या ऋतुराजकडून मराठीचे धडे घेत चेन्नईकर मुंबईत खेळण्यासाठी सज्ज

On: बुधवार, मार्च 24, 2021 6:24 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. हा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून भारतात रंगणार आहे. त्यामुळे आता सर्व संघांची तयारी जोरदार सुरु झाली आहे. अनेक संघांचे खेळाडू एकत्र जमू लागले आहेत. तसेच परदेशी खेळाडूंनीही भारतात येण्याची तयारी सुरु केली आहे.

यादरम्यान तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी सर्वात आधी सरावाला सुरुवात केली होती. त्यामुळे संघातील खेळाडूंची चांगलीच गट्टी जमलेली अनेक व्हिडिओमधून दिसून आली. नुकताच एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ऋतुराज गायकवाड मराठी शिकवताना दिसत आहे.

चेन्नईची आयपीएल २०२१ ची सुरुवात मुंबईतून

खरंतर यंदा कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएलचे आयोजन वेगळ्या प्रकारे करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळा प्रवास करणार आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी होईल. तसेच कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.

त्यामुळे यंदा चेन्नई संघाचे पहिले ५ सामने मुंबईत होणार आहेत. त्यानंतर चेन्नई साखळी फेरीतील पुढील सामने दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता येथे खेळणार आहे. चेन्नईचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.

ऋतुराज देतोय मराठीचे धडे

चेन्नईचे पहिले ५ सामने मुंबईत होणार असल्याने चेन्नई संघाकडून आयपीएलमध्ये खेळणारा मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या काही खेळाडूंना मराठीचे धडे देताना दिसत आहे. या शिकवणीचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘तमिळ मुलांसाठी मराठी १०१. मुंबईला जाण्याआधी ऋतुराज गुरुंचा क्लास सुरु आहे.’

या व्हिडिओमध्ये ऋतुराजसह आर साईकिशोर, एन जगदिशन आणि हरी निशांत हे खेळाडू दिसत आहेत. यावेळी ऋतुराज त्यांना काही मराठी वाक्य शिकवताना दिसत आहे. यात ऋतुराज गमतीने आर साईकिशोरला ‘मी वेडा आहे’, असे म्हणायलाही सांगत आहे. तसेच पुढे ऋतुराज एन जगदिसन खूप झोपाळू असल्याचे सांगत त्याला ‘मी झोपाळू आहे’ असे म्हणायला सांगत आहे. त्याचबरोबर ऋतुराजने हरी निशांतला म्हणायला सांगितले की ‘मी सज्जन आहे.’

त्याचबरोबर ‘तू कसा आहेस?’, ‘मी मस्त आहे’, ‘नाश्ता केलास का?’ असे काही सोपी वाक्यही ऋतुराजने शिकवली. तसेच त्यानंतर हे खेळाडू ‘शिट्टी वाजवा मुंबई, आम्ही येतोय’ असे देखील म्हणत आयपीएलसाठी चाहत्यांना सज्ज राहण्यास सांगत आहेत.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1374645125414981636

असे आहेत आयपीएल २०२१ मधील चेन्नई सुपर किंग्सचे साखळी फेरीतील सामने-

१० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई, दुपारी ३.३०
२८ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
१ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
५ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
७ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, बंगळुरू, दुपारी ३.३० वाजता
१२ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता

महत्त्वाच्या बातम्या –

पदार्पणातील दमदार कामगिरीने प्रसिद्ध कृष्णावर कौतुकाचा वर्षाव, ‘या’ दिग्गजांनी थोपटली पाठ

ब्रेकिंग! श्रेयस अय्यर दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर

दुसर्‍या वनडे सामन्यात रोहितच्या जागी मिळणार ‘या’ खेळाडूला संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---