इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १४ वा हंगाम आहे. आयपीएल म्हटलं की अनेक गोष्टींची चर्चा होत राहाते. त्यात विक्रमांच्याही चर्चा रंगतात. यंदाच्या हंगामातही अनेक खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची संधी आहे.
विशेष म्हणजे या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणाऱ्या पहिल्याच सामन्यातच रोहित शर्मा, विराट कोहलीसह अनेक खेळाडू विविध विक्रम करु शकतात. त्याच विक्रमांचा या लेखात आढावा घेऊ.
१. विराटला ६००० धावा करण्याची संधी
या हंगामात विराटने १२२ धावा करताच तो आयपीएलध्ये ६००० धावा करणारा पहिला फलंदाज बनेल. आत्तापर्यंत कोणीही आयपीएलमध्ये ६००० धावा केलेल्या नाही. सध्या विराटच्या नावावर ५८७८ धावा आहे. तसेच तो सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.
२. एबी डिविलियर्सला ५००० धावा पूर्ण करण्याची संधी
मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणाऱ्या एबी डिविलियर्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ४८४९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आगामी हंगामात त्याला ५००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्याचे येत्या हंगामात १५१ धावा केल्या की तो ५००० आयपीएल धावा पूर्ण करेल. हा टप्पा पार करणारा तो एकूण सहावा तर दुसरा परदेशी खेळाडू बनेल.
३. रोहित टाकू शकतो एमएस धोनीला मागे
रोहितने जर आणखी ४ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकेल. सध्या रोहितच्या नावावर २१३ षटकार आहेत, तर धोनीच्या नावावर २१६ षटकार आहेत.
४. पोलार्डला २०० षटकारांची संधी
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू किरॉन पोलार्डने आत्तापर्यंत १९८ षटकार मारले आहेत. त्यामुळे आणखी २ षटकार मारताच तो २०० षटकार पूर्ण करेल. याआधी हा विक्रम ख्रिस गेल, एबी डिविलियर्स(२३५), एमएस धोनी(२१६), रोहित शर्मा(२१३) आणि विराट कोहली (२०१) या पाच खेळाडूंनाच करता आला आहे.
५. चहलला १०० वा आयपीएल सामना खेळण्याची संधी
जर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून युजवेंद्र चहलला मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली तर हा त्याचा १०० वा आयपीएल सामना असेल. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ४१ खेळाडूंनी १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध युजवेंद्र चहल खेळला तर १०० आयपीएल सामने खेळणारा तो ४२ वा खेळाडू ठरेल. त्याने सध्या ९९ आयपीएल सामन्यात १२१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बालपणीच्या ‘मिसेस धोनी’ला ओळखण झालं कठीण, माय-लेकीच्या फोटोने चाहत्यांना पाडलं पेचात!
एमएस धोनी ते रिषभ पंत! जाणून घ्या यंदाच्या आयपीएल मधील आठही संघांचे कर्णधार
भारतीय कसोटीपटूंना आयपीएल २०२१ साठी मिळणार स्पेशल मुभा, करता येणार ‘ही’ गोष्ट






