अहमदाबाद। रविवारी (२ मे) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २९ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होत आहे. या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यापूर्वी पंजाबचा नियमित कर्णधार केएल राहुलला अपेंडिक्सचा त्रास होत असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याऐवजी मयंक अगरवाल संघाचे नेतृत्व करणार असून पंजाबने त्यांच्या ११ जणांच्या संघात निकोलस पूरन ऐवजी डेव्हिड मलानला संधी दिली आहे. तो आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.
तसेच दिल्लीने त्यांच्या ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
असे आहेत ११ जणांचे संघ –
पंजाब किंग्स – प्रभिसिमरन सिंग (यष्टीरक्षक), मयंक अगरवाल (कर्णधार), ख्रिस गेल, डेव्हिड मलान, दीपक हूडा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ख्रिस जॉर्डन, रिले मेरीडिथ, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत (यष्टीरक्षक / कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, स्टीव्हन स्मिथ, अक्षर पटेल, ललित यादव, कागिसो रबाडा, इशांत शर्मा, अवेश खान.