---Advertisement---

ऋतुराजच्या सेंचूरीच्या नादात जडेजाचा षटकार दुर्लक्षितच राहिला! पठ्ठ्याने गुडघ्यावर बसून चेंडू टोलवलाय सीमापार

On: रविवार, ऑक्टोबर 3, 2021 2:16 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या ४७ व्या सामन्यात शनिवारी (०२ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान राॅयल्स संघ एकमेकांसोबत भिडले. सामन्यात शेवटी राॅजस्थानने चेन्नईला ७ विकेट्स राखून मात दिली. असे असले तरीही, चेन्नईने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या केली होती. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने या सामन्यात त्याचे आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजाने फलंदाजी करताना शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी केली. याच षटकात रवींद्र जडेजाने एक अप्रतिम षटकारही मारला, ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

चेन्नईच्या डावाच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने ज्याप्रकारे खेळी केली आहे, त्यामुळे सर्वच खूष झाले आहेत. डावाच्या शेवटच्या षटकात राजस्थान राॅयल्स संघाचा महत्वाचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान गोलंदाजीसाठी आला होता. जडेजाने त्याच्यी चांगलीच धुलाई केली आहे. जडेजाने त्याच्या गोलंदाजीवेळी १ षटकार मारला, ज्यामुळे त्याचे चाहते खूपच खुश झाले आहेत. त्याने हा षटकार  खेळपट्टीवर गुडघ्यावर बसून मारला आहे. जडेजाचा षटकार पाहून गोलंदाजी करणारा रहमानही हैराण झाला होता.

https://www.instagram.com/p/CUjtz0dArgR/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://twitter.com/lmvijay72___/status/1444575723562233858?s=20

https://twitter.com/Mahi_esque/status/1444570557060575241?s=20

https://twitter.com/SERJodejaPopa/status/1444570543743668224?s=20

जडेजाने या षटकात एक षटकार आणि २ चौकार मारले आणि रहमानच्या गोलंदाजीवर पहिल्या तीन चेंडूत १४ धावा केल्या. चौथ्या चेंडूवर जडेजाने एक धाव घेतली आणि ऋतुराज गायकवाडला स्ट्राईक दिली. ऋतुराजने पाचवा चेंडू डॉट घातला आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एक दमदार षटकार मारला. ऋतुराजने मारलेल्या षटकारासोबतच त्याने त्याचे शतकही पूर्ण केले. रहमानने शेवटच्या षटकात एकूण २२ धावा दिल्या.

दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करत चेन्नईने २० षटकात १८९ धावा केल्या आणि राजस्थानसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. यामध्ये चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडची १०१ धावांची नाबाद खेळी महत्वाची होती. प्रत्युत्तरात राजस्थानने अवघ्या १७.३ षटकात आणि केवळ तीन विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले.

महत्त्वाच्या बातम्या-

वाऱ्याच्या वेगाने धावला शिखर, पण पोलार्डचा ‘बुलेट थ्रो’ क्षणभरांत यष्टीला धडकला अन् खेळ खल्लास

सीएसकेच्या स्टार क्रिकेटर रैनाची हरवली चमक! चाहते म्हणाले, “आता तू आराम करा, ‘तो’ भारी खेळेल”

अरेरे! प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारुनही ‘इतक्यांदा’ सीएसकेच्या नशीबी आलाय पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---