इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या (आयपीएल २०२१) दुसऱ्या टप्प्याचे बिगुल वाजले असून सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) सरावालाही लागले आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ सर्वांआधी युएईला पोहोचला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील या संघाची नजर यंदा चौथ्यांदा ट्रॉफी जिंकण्याकडे आहे. दरम्यान या संघाच्या नव्या संघनायकाविषयीही बऱ्याचदा चर्चा रंगताना दिसतात.
कारण विद्यमान कर्णधार धोनी ४० वर्षांचा असून तो जास्तीत जास्त अजून १-२ वर्षे आयपीएलमध्ये खेळू शकतो. अशात आता स्वत: सीएसकेचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याने भावी कर्णधार बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्याने ट्वीटरवर चाहत्यांच्या एका प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे कर्णधार बनण्याची इच्छा दर्शवली. मात्र त्यानंतर त्वरित त्याने आपली प्रतिक्रिया डिलीट केली. पण काहींनी त्याच्या प्रतिक्रियेचा स्क्रिनशॉट घेतला असून तो सध्या जोराने व्हायरल होतो आहे.
त्याचे झाले असे की, सीएसके संघाच्या ‘सीएसके फॅन्स आर्मी’ नामक एका चाहत्यांच्या पेजवरुन प्रश्न विचारण्यात आला की, धोनीनंतर तुम्ही कोणाला सीएसके संघाचा नवा कर्णधार निवडला. यावर जडेजाने प्रतिक्रिया देत ‘८’ असे लिहिले. खरे तर, जडेजाचा जर्सी क्रमांक ८ आहे. यावरुन स्पष्टपणे कळून येते की, जडेजाने धोनीनंतर स्वत:ला सीएसकेचा कर्णधार बनवण्याची इच्छा दाखवली आहे.
त्याने प्रतिक्रिया दिल्यांनंतर लगेचच ती डिलिटही केली आहे. परंतु चाहत्यांनी त्याचे स्क्रिनशॉट व्हायरल करत आपली मते मांडायला सुरुवात केली आहे. एका चाहत्याने तर लिहिले आहे की, ‘७ नंतर ८ नंबरच येतो. त्यामुळे धोनीनंतर जडेजाच येईल.’
😂⚔️🔥#WhistlePodu | @imjadeja 🦁 pic.twitter.com/Mnx93U9qCa
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) September 14, 2021
धोनीबरोबरच जडेजानेही सीएसकेला आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. फलंदाजी, गोलंदाजीबरोबर तो क्षेत्ररक्षणातही उत्कृष्ट असा खेळाडू राहिला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये १९१ सामने खेळताना त्याने २२९० धावा आणि १२० विकेट्सची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
घटस्फोटानंतर धवनची व्हिडिओ कॉलद्वारे मुलासोबत दंगामस्ती, पाहा बाप-लेकातील प्रेमळ क्षण
चौदा वर्षांनंतर टीम इंडियाकडे टी२० विश्वचषक जिंकण्याची संधी, पण ‘ही’ ३ कारणे फेरू शकतात पाणी
आयपीएल मोहिमेपूर्वी कर्णधार कोहलीचा नवख्या शिलेदाराला व्हॉट्सअप मॅसेज, लिहिले ‘हे’ प्रेरणादायी शब्द