बुधवारी (२९ सप्टेंबर) आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात राजस्थानला आरसीबीने सात विकेट्स राखून पराभूत केले. असे असले तरीही, राजस्थानच्या खेळाडूंनी सामन्यात चांगले क्षेत्ररक्षण केलेले पाहायला मिळाले आहे. सामन्यात एकीकडे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला रियान परागने धावबाद करून पव्हेलियनला पाठवले, तर दुसरीकडे मुस्तफिजुर रहमानने सीमारेषेजवळ उंच उडी मारून षटकारासाठी चाललेल्या चेंडूला अडवले. रहमानच्या या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच हैराण केले.
क्रिकेटचे चाहते तसेच दिग्गजही त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे हैराण झालेले पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, सामन्यात आरसीबीचा कार्तिक त्यागी गोलंदाजी करत होता आणि समोर ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करत होता. त्यागीच्या एका चेंडूवर म्यॅक्सवेलने षटकारासाठी एक मोठा शॉट खेळला. त्याने मारलेल्या या मोठ्या शॉटला अडवण्यासाठी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणाला थांबलेल्या मुस्तफिजुर रहमानने धाडस केले आणि उंच उडी मारून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला.
What a great stop by Mustafizur Rahman. Robs Glenn Maxwell of a six. #KKRvRCB pic.twitter.com/mfhiHlMdmE
— Ben Baby (@Ben_Baby) September 29, 2021
त्याने उडी मारली आणि चेंडू त्याच्या हातात आला. यानंतर क्षणभरात तो हातात आलेल्या चेंडूला सीमारेषेच्या आत फेकण्यामध्ये यशस्वी ठरला आणि षटकार वाचवला. यानंतर हा शाॅट मारलेला ग्लेन मॅक्सवेलही आश्चर्यचकित झालेला पाहायला मिळाला.
https://twitter.com/IPL/status/1443264290564165633?s=20
सामन्यात आरसीबीने राजस्थानला शेवटच्या ९ षटकात केवळ ४९ धावा करू दिल्या. कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजांच्या या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे सामना संपल्यानंतर त्यांचे कौतुक केले आहे. विराट म्हणाला, “आम्ही सलग दोन सामन्यांमध्ये गोलंदाजीत अप्रतिम पुनरागमन केले आहे, जे चांगले संकेत आहेत. आम्हाला माहित आहे की, जर गोलंदाजी करताना धैर्य कायम ठेवले तर तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात.”
दरम्यान, सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थानने २० षटकांत ९ विकेट्सच्या नुकसानावर १४९ केल्या होत्या आणि आरसीबीला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात आरसीबीने अवघ्या १७.१ षटकात आणि केवळ तीन विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले आणि सामन्यात विजय मिळवला. सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या यापूर्वीच्या सामन्यातही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी आरसीबीने मुंबईला केवळ १११ धावांवर सर्वबाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मॅक्सवेल पॅड घालून फलंदाजीसाठी होता तयार; मग चहलने केलं असं काही की, कॅमेरामनही खदखदून हसला!
युझवेंद्रने राजस्थानच्या फलंदाजांचा उडवला धुव्वा, पत्नी धनश्रीचा आनंद अनावर; फोटोंनी वेधले लक्ष
त्यावेळी मॉर्गनने विश्वचषक उचलण्यास नकार द्यायला हवा होता, सेहवागचा इंग्लिश कर्णधाराला टोला






