काही महिन्यांपूर्वीच आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये पार पडला. या हंगामाचे विजेेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले. आता हा हंगाम संपून दोन महिने होत आहेत आणि आता १४ व्या आयपीएल हंगामाचे बिगुलही वाजले आहेत. बुधवारी(२० जानेवारी) सर्व आयपीएलमधील सहभागी फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्यांच्या संघातील १२ खेळाडूंना कायम केले आहे. तर १० खेळाडूंना मुक्त केले आहे. कायम केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे यांचा समावेश आहे.
आरसीबीने मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये मोईन अली, शिवम दुबे, गुरकिरत सिंग मन, ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, इसरु उडाना आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. तर पार्थिव पटेल निवृत्त झाल्याने आणि डेल स्टेन उपलब्ध नसल्याने संघातून मुक्त झाले आहेत.
संघात रिकामी जागा – १३ खेळाडू (४ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – ३५.७ कोटी रुपये
IPL Retention Announcement 🔊 Here’s the news you’ve been waiting for, 12th Man Army. We have retained 12 stars from our 2020 squad. 🌟🤩#PlayBold #IPL2021 #WeAreChallengers pic.twitter.com/YkzSV3EUjU
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) January 20, 2021
राजस्थान रॉयल्स –
राजस्थानने त्यांचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला मुक्त केले आहे. त्यामुळे त्यांनी संजू सॅमसनला संघात कायम केले आहे. याशिवाय त्यांनी १७ खेळाडूंना संघात कायम केले आहे. तर ८ खेळाडूंना मुक्त केले आहे. संघात कायम केलेल्या खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, डेविड मिलर आणि अँड्र्यू टाय या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच संजू सॅमसन, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, रॉबिन उथप्पा, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, अनुज रावत, रियान पराग, महिपाल रोमरोर, श्रेयस गोपाळ आणि मनन वोहरा या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
तसेच मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये स्टिव्ह स्मिथसह ओशान थॉमस, आकाश सिंग, वरुण ऍरॉन, टॉम करन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग यांचा समावेश आहे.
संघात रिकामी जागा – ८ खेळाडू (३ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – ३४.८५ कोटी रुपये
🤷♂️ Not a secret anymore. #IPLRetention #HallaBol | #RoyalsFamily | #IPL2021 pic.twitter.com/jUmC9FzwjH
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 20, 2021
Forever a Royal…💗
Some special memories Smudge. 🤝#RoyalsFamily | @stevesmith49 pic.twitter.com/esOSQVtAtP
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 20, 2021
मुंबई इंडियन्स –
मुंबई इंडियन्सने संघात कायम केलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (यष्टीरक्षक), किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान यांचा समावेश आहे.
तर मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेनाघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाईल, शेर्फेन रदरफोर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख यांचा समावेश आहे.
संघात रिकामी जागा – ७ खेळाडू (४ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – १५.३५ कोटी रुपये
Thank you for everything! There will always be a special place for you all in MI’s #OneFamily! 💙#MumbaiIndians pic.twitter.com/qjhMLHPTLc
— Mumbai Indians (@mipaltan) January 20, 2021
चेन्नई सुपर किंग्स –
तीन वेळच्या चेन्नई सुपर किंग्सने ६ खेळाडूंना मुक्त केले आहे. चेन्नईने मुरली विजय, हरभजन सिंग, पियुष चावला, केदार जाधव आणि मोनू सिंग यांना मुक्त केले आहे. याशिवाय शेन वॉट्सन निवृत्त झाल्याने तो देखील मुक्त होणारा ६ वा खेळाडू आहे.
तसेच संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंमध्ये एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन यांचा समावेश आहे.
संघात रिकामी जागा – ७ खेळाडू (१ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – २२.९ कोटी रुपये
According to Leo, #Yellove finish with SIX and bid adieu emotions, coming soon! #StayTuned 🦁💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) January 20, 2021
किंग्स इलेव्हन पंजाब –
किंग्स इलेव्हन पंजाबने त्यांच्या १६ खेळाडूंना संघात कायम केले आहे. तर ९ खेळाडूंना मुक्त केले आहे. त्यांनी कायम केलेल्या खेळाडूंमध्ये केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरण सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल यांचा समावेश आहे.
तर मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विल्जॉइन, जगदीशा सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉट्रेल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गॉथम, तजिंदर सिंह यांचा समावेश आहे.
संघात रिकामी जागा – ९ खेळाडू (५ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – ५३.२ कोटी रुपये
🚨RETAINED KINGS 🚨➡️ Rahul, Gayle, Pooran, Shami, Jordan, Mandy, Mayank, Bishnoi, Prabhsimran, Hooda, Sarfaraz, Arshdeep, M Ashwin, Nalkande, Porel & Harpreet #IPLRetention #IPL2021 #SaddaPunjab
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 20, 2021
सनरायझर्स हैदराबाद –
सनरायझर्स हैदराबाद संघाने २२ खेळाडूंना संघात कायम केले आहे. कायम केलेल्या खेळाडूंमध्ये डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, मनिष पांडे, प्रियम गर्ग, विराट सिंग, वृद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, बेसिल थँपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर ,अब्दुल समद, मिशेल मार्श, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंग यांचा समावेश आहे. तर मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये संजय यादव, बी संदीप, बिली स्टॅनलेक, फॅबियन ऍलन, यारा पृथ्वीराज यांचा समावेश आहे.
संघात रिकामी जागा – ३ खेळाडू (१ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – १०.७५ कोटी रुपये
🚨 Attention #OrangeArmy 🚨#RisersRetained for #IPL2021 📑#IPLRetention pic.twitter.com/OsPeoLnDy2
— SunRisers Hyderabad (@SunRisers) January 20, 2021
दिल्ली कॅपिटल्स –
दिल्लीने ५ खेळाडूंना मुक्त केले असून यात ऍलेक्स कॅरे, किमो पॉल, संदिप लामिछाने, तुषार देशपांडे, मोहित शर्मा आणि जेसन रॉय यांचा समावेश आहे. तर संघात कायम केलेल्या खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, अावेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स , एन्रिच नॉर्किए यांचा समावेश आहे.
संघात रिकामी जागा – ६ खेळाडू (२ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – १२.८ कोटी रुपये
🚨 RETAINED PLAYERS 🚨
Back where they belong 😌
Here is the list of all the DC Stars who'll ROAR with us in #IPL2021 as well 🔥#YehHaiNayiDilli #IPLRetention pic.twitter.com/4Z3HusQwaD
— Delhi Capitals (@DelhiCapitals) January 20, 2021
कोलकाता नाईट रायडर्स –
कोलकाता नाईट रायडर्सने कायम केलेल्या खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारायण, इयॉन मॉर्गन (कर्णधार), पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
तसेच केकेआरनेदेखील केवळ ५ खेळाडूंना मुक्त केले आहे. यात एम सिद्धार्थ, निखिल नाईक, सिद्धेश लाड, ख्रिस ग्रिन, टॉम बंटन यांचा समावेश आहे.
संघात रिकामी जागा – ७ खेळाडू (१ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – १०.८५ कोटी रुपये
📣 Meet the Retained Knights for #IPL2021#KKR #Cricket pic.twitter.com/dkW857CWX8
— KolkataKnightRiders (@KKRiders) January 20, 2021
फेब्रुवारीमध्ये आयपीएल २०२१ चा लिलाव होणार आहे.