---Advertisement---

इथेच अडलीय गाडी; दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर रोहितचं पडलं तोंड, सांगितली कुठे होतेय चूक?

On: रविवार, ऑक्टोबर 3, 2021 2:23 PM
rohit-sharma
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात शनिवारी (०२ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्स राखून मुंबईवर विजय मिळवला आहे. हा सामना मुंबईसाठी खूप महत्वाचा होता, पण फलंदाजांच्या खराब प्रदर्शनामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर आली आहे. तसेच मुंबईला आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागणार आहे.

प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला आता राहिलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दरम्यान, सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने संघाच्या फलंदाजांना जबाबदार धरले आहे.

दिल्लीविरुद्ध सामना गमावल्यानंतर रोहित शर्माने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “आम्ही आमच्या क्षमतेप्रमाणे खेळत नाहीये. त्यामुळे आम्ही अजून प्लेऑफमध्ये पोहोचलो नाही. जर तुमचे फलंदाज धावा करत नाहीत तर, सामना जिंकणे अवघड होते. मी वैयक्तिकपणे हे स्वीकारतो. आम्ही आमच्या रणनितीला अंमलात आणू शकलो नाही आणि हे खरच निराशाजनक आहे. आम्ही आमच्या क्षमतेप्रमाणे खेळू शकलो नाही. आशा आहे की, राहिलेल्या दोन सामन्यात आम्ही आमच्या परिचयाप्रमाणे खेळू शकू.”

रोहित पुढे म्हणाला की, “आम्हाला माहित होते की शारजाहच्या मैदानावर फलंदाजी अवघड जाईल. आम्ही खूप सामने पाहिले होते आणि हे खेळण्यासाठी आणि धावा करण्यासाठी एक सोपी जागा नाहीये. आम्ही चांगली तयारी केली होती आणि आम्हाला माहिती होते की, आम्हाला काय करायचे आहे. मी विचार करतो की, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आम्हाला माहित होते की, हे १७०-१८० धावांची खेळपट्टी नाहीये, पण ही १४० धावांचीही खेळपट्टी नव्हे. आम्ही फक्त चांगली भागीदारी करू शकलो नाही.”

दरम्यान सामन्यात, मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये अवघ्या १२८ धावा केल्या. मुंबईच्या सूर्यकुमार यादवव्यतिरिक्त कोणताच फलंदाज चांगल्या धावा करू शकला नाही. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईने दिलेले लक्ष्य १९.१ षटकात आणि ६ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल १९० धावांचे आव्हान देऊनही सीएसकेचा पराभव, साक्षीला आश्चर्याचा धक्का; रिऍक्शन कॅमेरात कैद

वाऱ्याच्या वेगाने धावला शिखर, पण पोलार्डचा ‘बुलेट थ्रो’ क्षणभरांत यष्टीला धडकला अन् खेळ खल्लास

दोन्ही पायांच्या मधून आवेशने उडवली हार्दिकची दांडी, अप्रतिम चेंडूपुढे मुंबईकर निरुत्तर-VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---