आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने यूएईत आयोजित केले गेले असून पहिला सामना १९ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. यूएईतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू सराव करत असून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेही सरावाला सुरुवात केली आहे. तो यूएईत आल्यानंतरचा ६ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून पहिल्यांदाच मैदानात सराव करण्यासाठी आला आहे. पहिल्या सामन्याआधी त्याने खूप घाम गाळला आहे. मुंबई इंडियन्स त्याचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून पोस्ट केला आहे.
मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पाहा रोहित आला.’ (Dekho ???????? aa gaya!)
Dekho 𝐑𝐎 aa gaya! 🤩💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #KhelTakaTak @ImRo45 @MXTakaTak MI TV pic.twitter.com/N0X8czPQcF
— Mumbai Indians (@mipaltan) September 16, 2021
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित मैदानात सरावासाठी पायाला पॅड, हेल्मेट, पायात शूज घालून मैदानात प्रवेश करत आहे आणि खेळपट्टीकडे चालला आहे.
These 2️⃣ in sync! 🤩#OneFamily #MumbaiIndians #KhelTakaTak #IPL2021 @ImRo45 @surya_14kumar @MXTakaTak MI TV pic.twitter.com/PgXrVFQtwm
— Mumbai Indians (@mipaltan) September 17, 2021
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात रोहित त्याच्या चांगल्या फाॅर्ममध्ये दिसला होता. त्याने ७ सामन्यांमध्ये २५० धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने १२८ चा स्ट्राइक रेट राखला होता. तसेच त्याच्या सरासरीचा विचार केला तर ती ३५.७१ होती. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही रोहितने चांगली कामगिरी केली आहे. तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्यातही त्याचे चांगले प्रदर्शन कायम ठेवेल अशी चाहते आशा व्यक्त करत आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या पहिल्या टप्प्यानंतर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान, रोहितला आणि इतर भारतीय खेळाडूंना यूएईमध्ये आल्यानंतर ६ दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागेल आहे. यापूर्वी नियोजित कार्याक्रमात इंग्लंड दौऱ्यावरून यूएईमध्ये येणाऱ्या खेळाडूंना विलगीकरणात ठेवले जाणार नव्हते. मात्र, मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याआधी भारताच्या सपोर्ट स्टाफमधील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आणि पाचवा सामना रद्द केले गेला होता. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडवरून येणाऱ्या सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटने टी२०चे नेतृत्त्वपद सोडणे टीम इंडियाच्या येणार अंगाशी, ‘या’ गोष्टींमध्ये होऊन बसणार अवघड
विराटसारखा टी२० कर्णधार शोधून सापडणार नाही, ‘हे’ ५ अद्भुत विक्रम केले आहेत नावावर
दौरा रद्द केल्याने संतापले रमीज राजा, न्यूझीलंड बोर्डाला दिली धमकी