---Advertisement---

कोरोनामुळे आयपीएल २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द

On: मंगळवार, मे 4, 2021 1:11 PM
ipl-corona
---Advertisement---

भारतात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या सावटाखाली भारतातील वेगवेगळ्या शहरात आयपीएल २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. परंतु मागील दोन दिवसात चार क्रिकेटपटू आणि ३ इतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आयपीएलचा चौदावा हंगाम तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. मात्र पुन्हा मुंबईत किंवा इतरत्र बायो बबलमध्ये उर्वरित सामने खेळवण्याचा विचार चालू आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पुढे ढलकण्यात आला होता.

https://twitter.com/IPL/status/1389492203609747458?s=20

त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे ३ सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने बुधवारी होणारा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे. अशात आज सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सटा अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

आतापर्यंत आयपीएल २०२१ चे २९ सामने सुरळितपणे पार पडले आहेत. अहमदाबाद येथे पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शेवटचा सामना झाला होता.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---