आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा थरार येत्या काही दिवसात रंगणार आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेचा शुभारंभ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वीच ३ बलाढ्य संघांना मोठा फटका बसला आहे.
गतवर्षी कोरोना असल्या कारणामुळे आयपीएलचे १३वा हंगाम युएईमध्ये पार पडले होते. परंतु यंदा ही स्पर्धा भारतातच होणार आहे. या स्पर्धेचे सामने मुंबई,चेन्नई ,कोलकाता,दिल्ली,बंगळूरु आणि अहमदाबादमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेला अवघे काही दिवस असताना मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील मुख्य खेळाडूंना सुरुवातीचा सामना खेळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
पहिल्या सामना ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक संघात नसणार आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघातून महत्वाचे गोलंदाज कगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्खिया हे संघाबाहेर असणार आहेत. यासोबतच लुंगी एन्गिडी आणि डेव्हिड मिलर हे खेळाडू देखील आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहेत. हे चौघे खेळाडू पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकन संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही मालिका २ एप्रिल पासून ते ७ एप्रिल पर्यंत असणार आहे. ही मालिका खेळून भारतात आल्यानंतर या खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागणार आहे.
आयपीएलमध्ये खेळाडूंना बबल टू बबलमध्ये येण्याची सुविधा देण्यात आली आहे. परंतु यासाठी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने प्रवास करणे अनिवार्य केले होते. परंतु खेळाडू चार्टर्ड विमानाने येत नसतील तर त्यांना पाहिले २ सामने खेळण्यापासून वंचित राहावे लागु शकते.चेन्नई सुपर किंग्स संघाने स्पष्ट केले आहे की ,लुंगी एन्गिडी पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. यावरून असे दिसून येत आहे की,चेन्नई संघ लुंगी एन्गिडीसाठी चार्टर्ड विमान पाठवणार नाही. यामुळे त्याला ७ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. जर कगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्खिया यांना पहिले २ सामने खेळता आले नाही तर दिल्ली कॅपिटल संघाला याचा मोठा फटका बसू शकतो.
हेही वाचा-
–आयपीएलमधून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरने दिल्लीच्या नवनियुक्त कर्णधार रिषभ पंतला अशा दिल्या शुभेच्छा
–मला पुन्हा कर्णधार केलं नाही तर कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाहा काय दिलंय स्मिथने उत्तर
–क्रिकेट ऑस्ट्रेलियातील या दिग्गज व्यक्तीने स्टिव स्मिथला पुन्हा कर्णधार करण्यास दिलाय नकार