आयपीएल हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून देशी परदेशी खेळाडूंनी मोठे नाव कमावले आहे. आयपीएलच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवताना स्वतःला सिद्ध पण करून दाखवले आहे. भारताच्या आर अश्विनपासून तर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि औस्ट्रेलियाचा शॉन मार्शपर्यंत हा प्रवास जाऊन थांबतो. त्यांनी आयपीएलचा उपयोग राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी करून घेतला. आयपीएलमधून स्थानिक पातळीवरील खेळाडू लक्षाधीश झाले आहेत आणि त्यांच्या खेळाला वाव पण मिळाला आहे.
शिवम दुबे पण झाला आयपीएल मधून लक्षाधीश
शिवम दुबेने २०१५-२०१६ साली सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून पदार्पण केले आणि त्यानंतर मग मागे वळून पाहिले नाही. उल्लेखनीय बाब ही की, त्याने रणजी करंडक सामन्यात मुंबईकडून खेळताना एका षटकात पाच षटकार लावले. तो षटकारांच्या जोरावर चर्चेत आला होता. २०१८ साली झालेल्या मुंबई लीगमध्ये त्याने प्रवीण तांबेला सलग पाच बॉलवर पाच षटकार लावले होते. आरसीबीच्या टीमने शिवम दुबेसाठी पाच कोटी रुपयांची रक्कम मोजली होते. मात्र पूर्ण हंगामात त्याला आरसीबी संघाकडून फक्त चारच सामने खेळायला मिळाले होते.
वडिलांच्या मदतीसाठी सोडले होते क्रिकेट
शिवम दुबेने लहानपणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. सहाव्या वर्षी चंद्रकांत पंडित क्रिकेट अकादमी, अंधेरी वेस्ट मुंबई इथून क्रिकेट खेळायला सुरुवात करताना सतीश सामंता यांच्याकडे खेळाचे प्रशिक्षण घेतले.
शिवम दुबे याच्या वडिलांचा आधी डेयरी पदार्थांचा व्यवसाय होता. त्यानंतर त्यांनी जीन्स धुण्याचे काम केले. नंतर त्या व्यवसायाचे कारखान्यात रूपांतर झाले. वडिलांच्या व्यवसायाला हातभार न लावता, शिवमचे क्रिकेटकडे जास्त लक्ष असल्यामुळे त्याच्या वडिलांना कामास त्रास व्हायला लागला. त्यामुळे त्याला क्रिकेट सोडावे लागले. पण नियतीला त्याचे क्रिकेट सोडणे मान्य नव्हते.
शिवमला दुबईला परत क्रिकेट खेळायला पाठवण्यास त्याचे काका रमेश दुबे आणि चुलत भाऊ राजीव दुबे यांनी मदत केली होता. त्यांनी त्याला सर्व सुविधा पुरवल्या.
यावेळी शिवम दुबे राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला टीममध्ये घेण्यासाठी चक्क ४.४० कोटी रुपये मोजले आहेत. तो राजस्थान रॉयल्स संघातून कशी कामगिरी करतो आणि परत राष्ट्रीय संघात कसे धमाकेदार आगमन करतो? ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतातील सर्वात सुंदर स्टेडियमवर होणार आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकाचा पहिला सामना!






