आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळला जाणार आहे. यापूर्वी आयपीएल कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आली होती. आयपीएल २०२१ हंगामातील पहिले २९ सामने भारतात खेळले गेले आहेत आणि आता उर्वरित ३१ सामने आता यूएईमध्ये खेळले जातील. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोंबरला खेळला जाईल.
नेहमीप्रमाणे यावेळीही फलंदाज आणि गोलंदाजांसह अष्टपैलूही त्यांच्या कामगिरीने आयपीएल संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावू शकतात. या लेखात आपण अशा तीन अष्टपैलू लेळाडूंविषयी माहिती घेणार आहोत जे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या उत्तम प्रदर्शनाच्या जोरावर सर्वाचे लक्ष वेधून घेऊ शकतात.
तीन अष्टपैलू खेळाडू, जे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात करू शकततात दमदार कामगिरी
१. रवींद्र जडेजा
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चांगील आमगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात त्याने ७ सामन्यांमध्ये १३१ धावा केल्या आहेत. तसेच ६.७० च्या इकाॅनाॅमीने ६ विकेट्सही घेतल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातही तो चांगली कामगीरी करू शकतो.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने यूएईमध्ये खेळले जाणार असून तेथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असते. अशात जडेजा त्याच्या संघासाठी चांगली गोलंदाजी करू शकतो. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या हंगामामध्ये जडेजाने १४ सामन्यांमध्ये १७१.८५ च्या स्ट्राइक रेटसह २३२ धावा केल्या होत्या. तसेच ६ विकेट्सही मिळवल्या होत्या. यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात जडेजाच्या खांद्यावर संघाला पुढे घेऊन जाण्याची महत्वाची जबाबदारी आहे.
२. हार्दिक पांड्या
मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. मात्र, तो मागच्या काही काळापासून त्याच्या खराब फाॅर्मशी झगडत आहे. तो आयपीएलच्या २०२१ च्या पहिल्या टप्प्यात, जो भारतात खेळला गेला होता यामध्ये काही खास प्रदर्शन केले नव्हता. पहिल्या टप्प्यात त्याने ७ सामन्यांमध्ये अवघ्या ५२ धावा केल्या होत्या आणि एकही विकेट घेतली नव्हती.
हार्दिक त्याच्या खराब फाॅर्ममध्ये असला तरी चाहत्यांना तो दुसऱ्या टप्प्यात चांगले प्रदर्शन करेल अशी अपेक्षा आहे. हार्दिकने यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती. यामध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये १७८.९८ त्या स्ट्राइक रेटने २८१ धावा केल्या होत्या.
हार्दिक टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवडला गेला आहे. अशात, त्याला फार्ममध्ये येणे गरजेचे आहे. कारण त्याच पार्श्वभूमीवर त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संघी मिळू शकते.
३. मार्कस स्टोइनिस
दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिस आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात जास्त खास फार्ममध्ये दिसला नव्हता. त्याने पहिल्या टप्प्यात ८ सामन्यांमध्ये १४४.८९ च्या स्ट्राइक रेटने ७१ धावा केल्या होत्या आणि ५४.५० च्या सरासरीने २ विकेट्सही घेतल्या होत्या.
पण आयपीएलच्या मागच्या हंगामामध्ये त्याने १७ सामन्यांत १४८.५२ च्या सरासरीने ३५२ धावा केल्या होत्या. तसेच १३ विकेट्सही घेतल्या होत्या आणि दिल्ली कॅपिटल्सला स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात या खेळाडूकडून चाहत्यांना चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा संघाने मागच्या हंगामाप्रमाणेच या हंगामातही चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. संघ त्यांचे हे प्रदर्शन दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
असे ३ गोलंदाज, जे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात घेऊ शकतात सर्वाधिक विकेट्स; २ भारतीयांचा समावेश
‘या’ ३ कारणांमुळे रोहितला टी२०चा कर्णधार बनवणे बीसीसीआयची मोठी चूक, नंतर होईल पश्चाताप!
भारताला बरोबरीची टक्कर देण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह उतरेल पाकिस्तानचा संघ, पाहा संभाव्य प्लेइंग XI