कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 मध्यांतरीच स्थगित करण्यात आली होती. परंतु आता भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) उर्वरित आयपीएल सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार असून अनेक विदेशी खेळाडूंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह आहे. अशात न्यूझीलंडचा आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट हादेखील राहिलेल्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
आता त्याने आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांबद्दल महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्याला नक्कीच युएईत आयपीएलचे उरलेले सामने खेळायला आवडेल, असे त्याने सांगितले आहे.
युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल संदर्भात ट्रेंट बोल्टच मोठे विधान
बोल्टने सांगितले की, “आयपीएलचे राहिलेले सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत आणि गतवर्षी देखील त्या ठिकाणी अतिशय शानदार आयोजन करण्यात होते. माझ्या संघाकडून खेळताना मला या स्पर्धेचा समारोप शानदार पद्धतीने करण्याची इच्छा आहे.”
भलेही बोल्टने आयपीएल स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली असली; तरी त्यावेळी न्यूझीलंडचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक काय असेल हे बघावे लागेल? कारण सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड संघाची पाकिस्तानविरुद्ध नियोजित मालिका होणार आहे. जर त्यावेळी ट्रेंट बोल्टची निवड संघात केली गेली तर तो आयपीएलचा भाग नसेल.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनेही युएईमध्येच होणार असल्याने न्यूझीलंड संघ व्यवस्थापन कोणता निर्णय घेईल याकडे आयपीएलप्रेमींचे लक्ष असेल. जर बोल्टची राष्ट्रीय संघात निवड झाल्यास तो मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का असेल.
विजयाचा शिल्पकार ट्रेंट बोल्ट
गतवर्षी युएईमध्येच झालेल्या आयपीएल हंगामात ट्रेंट बोल्टने धारदार गोलंदाजी केली होती. त्याच्या योगदानामुळे मुंबई इंडियन्सने अनेक सामन्यात संघाला विजय मिळवून दिला होता. त्याने आयपीएल 2020 मध्ये 15 सामने खेळताना 25 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्याचं प्रेम पाहून परदेशी खेळाडू थक्क; म्हणाला, ‘भारतात क्रिकेट आणि धोनीची पूजा होते’
बांगलादेशला नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा शोध, तब्बल १००० विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची वर्णी?
प्रत्येक आंतरराष्ट्रीय शतक षटकार मारुनच पूर्ण केलेले खेळाडू, दोन्ही आहेत भारतीय