बुधवारी (६ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२१ चा ५२ वा सामना खेळला गेला. सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला सनरायझर्स हैदराबादने अवघ्या चार धावांनी पराभूत केले. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली नेहमीच युवा खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचे काम करत असतो. या सामन्यात झालेल्या आरसीबीच्या पराभवानंतरही कर्णधार विराट विरोधी संघाचा वेगवान गोलंदीज उमराने मलिकसोबत चर्चा करताना दिसला आणि त्याने उमरानला एक खास भेटही दिली आहे.
उमरान मलिक मुळचा जम्मू कश्मीरचा रहिवासी आहे. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये सरनरायझर्स हैदराबाद संघासाठी पदार्पण केले आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात उमरानने आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे. त्याने या सामन्यात १५३ किमी दर ताशी वेगाने हा चेंडू फेकला आहे. त्याने या सामन्यात त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये एकूण २१ धावा दिल्या आणि एक विकेटही घेतला. त्याच्या या खेळीसाठी त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
There are fast bowlers, and then there is Umran Malik 🔥#OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021 pic.twitter.com/7J0w6yhlIW
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 6, 2021
हैदराबादने सामन्यात विजय मिळवल्यानंतर उमरानला कर्णधार विराटने एक खास भेट दिली आहे. विराटने उमरानच्या जर्सीवर त्याची स्वाक्षरी केली आहे. उमरान आणि विराटचे सामन्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. विराटने त्याच्या जर्सीवर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त त्याचे कौतुकही केले आणि या खेळाडूवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे तो म्हणाला आहे.
Always a delight when @imVkohli is around. #RCBvSRH #OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021 pic.twitter.com/A4gXdhGhDH
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 7, 2021
This is beautiful. Smile in the face of Umran Malik when Virat Kohli signing the jersey. pic.twitter.com/PyPfvTWJvM
— Johns. (@CricCrazyJohns) October 6, 2021
दरम्यान, सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली होती आणि हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत मर्यादित २० षटाकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १४१ धावा केल्या आणि आरसीबीला विजयासाठी १४२ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात आरसीबीने लक्ष्याचा पाठलाग करत २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावल्या आणि संघ १३७ धावा करू शकला. परिणामी सनरायझर्स हैदराबादने चार धावांनी सामन्यात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
कौतुकाची थाप तर हवीच! विलियम्सनने बेंगलोरविरुद्धच्या ‘रॉयल’ विजयाचे श्रेय दिले ‘या’ भारतीयाला
एकच मारला पण विक्रमी ठरला! भुवीच्या षटकात कडक षटकार खेचत डिविलियर्सचा ‘भीमपराक्रम’
कर्णधार विराटने सांगितले सनरायझर्सविरुद्धच्या पराभवाचे कारण; म्हणाला, “शेवटी डीविलियर्सने….”