---Advertisement---

आयपीएल २०२१ मधील अनोखे पण शानदार विक्रम, जे तुम्हाला फारसे माहितही नसतील; वाचा

On: बुधवार, मे 5, 2021 11:55 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलला ‘इंडिया का त्योहार’ असेही म्हटले जाते. या जगप्रसिद्ध लीगमध्ये खेळण्याची आणि त्यातील सामने पाहण्याची उत्स्तुकता भारतीयांसह परदेशींनाही असते. कोरोनाच्या सावटाखाली भारतात आयोजित करण्यात आलेला आयपीएल २०२१ चा हंगाम सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. परंतु आयपीएलचा रोमांच मात्र तसूभरही कमी झालेला नाही.

याच आयपीएलच्या चौदाव्या हंगामात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. त्यातील बरेचसे विक्रम आपल्याला अगदी तोंडपाठ असल्याप्रमाणे असतील. परंतु असे काही अनोखे विक्रमही आयपीएल २०२१ मध्ये झाले आहेत, जे पाहून तुम्ही चकित व्हाल. अशाच काही विक्रमांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे. चला तर सुरुवात करुया…

-चार चेंडूंमध्ये तीन चौकार किंवा षटकार मारणारा आयपीएलचा दहावा फलंदाज
शिमरॉन हेटमायर (१६ धावा, ४ चेंडू, १ चौकार आणि २ षटकार)

-तीन वेळा ट्वेंटी ट्वेंटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा फलंदाज
संजू सॅमसन

-९.३ च्या सर्वोत्कृष्ट रन रेटने लेग स्पिनरविरुद्ध फटकेबाजी करणारा फलंदाज
पृथ्वी शॉ

-सामन्यातील पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्विपसह चौकार मारत खेळीची सुरुवात करणारा पंधरावा फलंदाज 
रिषभ पंत (रॉबिन उथप्पा पहिला क्रिकेटपटू)

-पळून हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
शिखर धवन-१२७
फाफ डू प्लेसिस- १२६
रोहित शर्मा- ११२
डेविड वॉर्नर- ९७
विराट कोहली- ९०

-आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक षटकार-चौकार मारणारे संघ
हैदराबाद (७४ चौकार, ४३ षटकार)
बेंगलोर (९४ चौकार, ४३ षटकार)
राजस्थान (१०६ चौकार, ५२ षटकार)
मुंबई (८७ चौकार, ४२ षटकार)
कोलकाता (९८ चौकार, ४८ षटकार)
पंजाब (९६ चौकार, ५७ षटकार)
दिल्ली (१४२ चौकार, ३२ षटकार)
चेन्नई (११३ चौकार, ६२ षटकार)

महत्त्वाच्या बातम्या-

चर्चा तर होणारचं! ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोवर मराठमोळा ऋतुराज घायाळ, दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

धक्कादायक! ‘या’ माजी क्रिकेपटूचं अपहरण, बंदुकीचा धाक दाखवत करण्यात आली मारहाण

कोरोना काळात आयपीएलद्वारे कमावलेले १००० कोटी कोविड-१९ रुग्णांसाठी दान करा, वकिलाने दाखल केली याचिका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---