ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिल यांचे घरात घुसून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. सोबतच बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आले आणि पुढील एका तासात त्यांची सुटका करण्यात आली असल्याचेही समजत आहे. हा सर्व प्रकार १४ एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ व्यक्तींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी ५० वर्षीय मॅकगिल यांना ३ अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना सिडनी शहरातील बेलमोर या ठिकाणी घेऊन जाण्यात आले. तिथे त्यांना मारहाण करण्यात आली. शेवटी बंदुकीचा धाक दाखवत त्यांना धमकावण्यात आले आणि एका तासाने आरोपींनी त्यांची सुटका केली. २० एप्रिल रोजी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर लूटमार आणि गंभीर अपराध विभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. आज (५ मे) सकाळी याप्रकरणी पोलिसांनी ४ व्यक्तींना अटक केली आहे. यामध्ये २७, २९, ४२ आणि ४६ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना स्थानिक पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
मॅकगिल यांना ऑस्ट्रेलियाच्या प्रतिभाशाली क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. १०९८ ते २००८ या कालावधीत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी अनेक विक्रमांची आपल्या नावे नोंद केली होती. ४४ कसोटी सामने खेळताना त्यांनी तब्बल २०८ विकेट्स चटकावल्या होत्या. यात १०८ धावांवर ८ विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी राहिली होती. याबरोबरच ३ वनडे सामने खेळताना त्यांनी ६ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना काळात आयपीएलद्वारे कमावलेले १००० कोटी कोविड-१९ रुग्णांसाठी दान करा, वकिलाने दाखल केली याचिका
‘सर रविंद्र जडेजा नको, मला फक्त..’, आपले कौतुक करणाऱ्या समालोचकाला जड्डूचे मन जिंकणारे उत्तर
‘खत्म, टाटा, बाय-बाय’; आयपीएल २०२१चा हंगाम स्थगित झाल्याने RRच्या खेळाडूची हटके प्रतिक्रिया