आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला वेंकटेश अय्यरच्या रूपात एक नवीन आणि युवा सलामी फलंदाज मिळाला आहे. त्याने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याचे आयपीएल पदार्पण केले आहे. त्याने या सामन्यात २७ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावा केल्या होत्या. तसेच शुभमन गिलसोबत ८२ धावांची भागीदारी करून केकेआरला अप्रतिम विजय मिळवून दिला आहे.
त्याने या सामन्यात ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यानंतर नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. याचीच झलक आपण त्याच्या सराव सत्रातील फलंदाजीमध्ये पाहू शकतो. केकेआरने त्यांचा सराव सत्रातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वेंकटेश अय्यर केकेआरच्या सराव सत्रामध्ये त्याच्या अनोख्या अंदाजामध्ये स्विच हिट शाॅट खेळाताना दिसला आहे. केकेआरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो उत्तम फलंदाजी करताना दिसत आहे. यामध्ये त्याने २ एकदम अनोखे शाॅट खेळले आहेत. पहिला म्हणजे अनोखा स्विच हिट शाॅट, ज्यासाठी टी२० क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेलला ओळखले जाते. यामध्ये उजव्या हाताचा फलंदाज फिरून कवर्सच्या क्षेत्रात शाॅट मारतो आणि डाव्या हाताचा फलंदाज चेंडूला मिड विकेट्सच्या क्षेत्रात पाठवतो.
वेंकटेशने चेंडू योग्यप्रकारे मारत यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा शॉट मारला आणि त्या चेंडूने सीमारेषा पार केली आहे. हा शाॅट खेळताना त्याचा अंदाज पाहण्यासारखा होता. याव्यतिरिक्त अय्यरने ऑफ साइडला एका हाताने एक अप्रतिम शाॅटही मारला आहे.
5️⃣8️⃣ seconds of #VenkateshIyer in his element ????#KKR #AmiKKR #KorboLorboJeetbo #আমিKKR #IPL2021 pic.twitter.com/l0ZXn2hLW6
— KolkataKnightRiders (@KKRiders) September 22, 2021
केकेआरने अय्यरच्या फलंदाजीचा जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वेंकटेश अय्यरचे त्याच्या अंदाजामधील ५८ सेकंद.” केकेआरला आयपीएलच्या पुढच्या सामन्यातही वेंकटेशकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.
केकेआरचा पुढील सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध गुरुवार रोजी (२३ सप्टेंबर) अबु धाबी येथे होणार आहे. अशात या सामन्यातही अय्यर मुंबईच्या गोलंदाजांची दाणादाण उडवतो की मुंबईकर त्याचा समाचार घेतात? हे पाहाणे रोमांचक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईकरांना पुनरागमन करणं चांगलचं माहित आहे! संघनायक रोहतची केकेआरला चेतावणी, वाचा काय म्हणाला?
‘त्या’ व्यक्तीने विराटला टी२० अन् वनडेची कॅप्टन्सी सोडण्याचा दिला होता सल्ला, रहस्य उलगडलं!
“आयपीएल २०२१ नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडतो म्हणणाऱ्या विराटची अर्ध्यातच होईल हाकालपट्टी”






