इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना १९ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. या टप्प्यातील उद्घाटनाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला २० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता येत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ जोरदार पुनरागमन करेल, असा विश्वास कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला आहे.
गुरुवारी (२३ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. एका संघाला दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसऱ्या संघाने जोरदार विजय मिळवत स्पर्धेला सुरुवात केली आहे.
या सामन्यापूर्वी झालेल्या मुलाखतीत रोहित शर्माने म्हटले की, “यापूर्वी काय झाले आहे या गोष्टींवर आम्ही जास्त विचार करत नाही. टी-२० क्रिकेटमध्ये काही क्षणातच सर्व काही बदलू शकतं. आम्हाला फक्त आमची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडायची आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने गेल्या काही काळात खूप चांगली कामगिरी केली आहे. तसेच पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास आणखी उंचावला असेल.”
रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात संघाबाहेर होता. परंतु कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो खेळताना दिसून येणार आहे. तसेच दोन्ही संघांच्या कामगीरीबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ २८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान २२ सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ६ वेळेस कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारली आहे.
"It's important that we turn up and do the job!" ????
Captain Ro previews #MIvKKR ????️????#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #KhelTakaTak @ImRo45 @MXTakaTak MI TV pic.twitter.com/HxomGIvAHC
— Mumbai Indians (@mipaltan) September 23, 2021
अशी असू शकते कोलकाताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मुंबईची प्लेइंग ईलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टिरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या/सौरव तिवारी, कृणाल पंड्या, राहुल चाहर, एडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ व्यक्तीने विराटला टी२० अन् वनडेची कॅप्टन्सी सोडण्याचा दिला होता सल्ला, रहस्य उलगडलं!






