आयपीएलचा चौदावा हंगाम सुरु होण्यास फक्त महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने नुकतेच आयपीएलच्या आगामी हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. ९ एप्रिल ते ३० मेदरम्यान ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग खेळली जाईल. मात्र, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली जाईल का? याबाबत बीसीसीआयने निर्णय दिला आहे.
या मैदानांवर होणार सामने
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा परिणाम कमी करण्यासाठी बीसीसीआयने मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये आयपीएल सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मागील काही दिवसांत महाराष्ट्रात कोविड-१९ च्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने मुंबईमध्ये आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन होणार का नाही? याबाबत साशंकता होती. मात्र, आता राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर मुंबईत सामने खेळवले जाणार आहेत.
विनाप्रेक्षक होणार आयपीएल
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी नुकतेच आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामध्ये मैदानात प्रेक्षक येणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले. बीसीसीआयकडून आलेल्या अधिकृत वृत्तानुसार, ‘यावर्षीदेखील आयपीएलचा हंगाम विनाप्रेक्षक खेळविण्यात येईल. सुरुवातीच्या काळात प्रेक्षक मैदानावर येणार नाहीत. मात्र, कोरोना या आजाराचा प्रभाव कमी झाल्यास स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली जाऊ शकते.’
कोविड-१९ चा प्रभाव वाढल्याने आयपीएल २०२० भारताबाहेर युएई येथे बंद दाराआड खेळली गेली होती.
अशा रीतीने खेळविले जातील सामने
बीसीसीआयने जाहीर केल्याप्रमाणे पुढील आयपीएलचे सर्व सामने सहा शहरांमध्ये खेळविले जातील. चेन्नई, बेंगलोर, कोलकत्ता व मुंबई येथे प्रत्येकी १० तर दिल्ली व अहमदाबाद प्रत्येकी आठ सामन्यांचे आयोजन केले. प्ले ऑफचे सर्व सामने जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. विशेष म्हणजे, यावर्षी कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! आयपीएल २०२१ चं अखेर ठरलं, ‘या’ दिवशी होणार हंगामाची सुरुवात
“गेल्या दोन वर्षात विराटने हार मानली नाही, म्हणून कसोटी चॅम्पियनशीप..,” राहुलने केला खुलासा
“रोहित शर्माला वर्ल्ड कप उंचावताना पाहायचे आहे”, संघ सहकाऱ्याने व्यक्त केली इच्छा