भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी यूएईमध्ये आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम गोलंदाजी करत आहे. चहलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या मागच्या काही सामन्यांमधील विजयात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. तसेच त्याने त्याच्या खराब फाॅर्ममूळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांनाही चांगलेच उत्तर दिले आहे. त्याच्या फाॅर्ममध्ये झालेल्या बदलावानंतर चहललने एक प्रतिक्रिया दिली आहे.
त्याला त्याच्या योग्यतेवर विश्वास आहे आणि त्यामुळे त्याला विकेट मिळवण्यामध्ये मदत मिळते असे त्याने सांगितले आहे. आगामी टी२० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे आणि त्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात चहलला संधी दिली गेली नाही.
चहल आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नव्हता. मात्र, आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र, त्याने जबरदस्त पुनरागमन केले आहे. राजस्थान राॅयल्सविरुद्ध २९ सप्टेंबरला पार पडलेल्या सामन्यात त्याने चार षटकात १८ धावा देत दोन विकेट्सही घेतल्या होत्या. त्याला या कामगिरीसाठी सामनावीर म्हणूनही निवडले गेले होते.
याबाबात बोलताना चहल म्हटला आहे की, “आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात त्याने चांगली गोलंदाजी केली नव्हती, त्यानंतर त्याने वरिष्ठांशी चर्चा केली आणि माहित झाले की, चूक कुठे होत आहे. श्रीलंकेत मी पुनरागमन केले, मला वाटते की आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि येथे मी त्याचाच उपयोग करत आहे.”
चहल भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी इच्छूक असणार आहे. चहलने जर त्याचे अप्रतिम प्रदर्शन असेच सुरू ठेवले तर त्याला आगामी टी२० विश्वचषकाठी भारतीय संघात सामील केले जाऊ शकते. टी२० विश्वचषकापूर्वी १० ऑक्टोंबरपर्यंत बोर्ड त्यांच्या संघात बदल करू शकतात आणि या पार्श्वभूमीवर निवडकर्ते चहलच्या नावावर विचार करू शकतात. सध्या विश्वचषकासाठी चहलच्या जागेवर राहुल चाहरला संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आजही काहीच नाही बदललं यार!’ धोनीचा विजयी षटकार पाहून ‘या’ माजी खेळाडूने दिली प्रतिक्रिया
गेल्या तीन महिन्यांपासून गुलाबी चेंडू किटमध्ये घेऊन फिरली मंधना, ‘हे’ होते खास कारण