---Advertisement---

VIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज

On: सोमवार, सप्टेंबर 20, 2021 8:46 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून (रविवार) यूएईमध्ये खेळायला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला असून दुसरा सामना आज (२० सप्टेंबर, सोमवार) कोलकाता नाइट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात केकेआरचे प्रदर्शन खराब राहिले होते आणि संघाचे फलंदाजही काही कमाल करू शकले नव्हते. मात्र, आता यूएईमध्ये दुसऱ्या टप्प्यात ओएन माॅर्गनच्या नेतृत्वात केकेआर संघ आणि संघाचे फलंदाज पहिल्या टप्प्याच्या तुलनेत चांगले प्रदर्शन करतील अशी चाहत्यांना आशा आहे. दुसऱ्या टप्प्यातील अभियानाला सुरुवात करण्यापूर्वी सराव सामन्यामध्ये शुबमन गिल आणि त्यापाठोपाठ राहुल त्रिपाठी यांनी दमदार फलंदाजी केली आहे. त्यांचा हा चांगला फार्म पाहून बेंगलोरच्या गोलंदाजांची चिंता वाढू शकते.

राहुलची सरावात आतिषबाजी

कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून राहुल त्रिपाठीचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यामध्ये राहुल एकापाठोपाठ एक मोठे-मोठे शाॅट खेळताना दिसत आहे. त्याच्यासमोर फिरकी गोलंदाज असो किंवा वेगवान गोलंदाज, तो प्रत्येकाचा चेंडू मैदानाबाहेर मारण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातही राहुलचे प्रदर्शन केकेआरच्या बाकी फलंदाजांच्या तुलनेत चांगले राहिले होते. त्याने पहिल्या टप्प्यात सात सामन्यांमध्ये १३५.५० च्या स्ट्राइक रेटसह १८७ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेशही होता. मागच्या वर्षी, २०२० मध्ये आयपीएल यूएईमध्येच खेळली गेली होती. त्या हंगामामध्ये राहुलने केकेआरसाठी ११ सामन्यांमध्ये २३० धावा केल्या होत्या.

केकेआर गुणतालिकेत सातव्या स्थानी

कोलकाता नाइट रायडर्स सध्या आयपीएल गुणतालिकेत खालून दुसऱ्या, म्हणजेच सातव्या स्थानावर आहे. केकेआरने पहिल्या टप्प्यात सात सामने खेळले असून त्यातील केवळ दोन सामने जिंकले आहेत आणि पाच सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघ दुसऱ्या टप्प्यात माॅर्गनच्या नेतृत्वात आणि प्रमुख गोलंदाज पॅट कमिंसच्या गैरहजेरीत यूएईमध्ये पोहचला आहे. असे असले तरी, संघासोबत शाकिब अल हसन आणि आंद्रे रसलसारखे खेळाडू उपस्थित आहेत आणि संघाला प्लेऑफमध्ये पोहचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---