मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२२ मध्ये निराशाजनक प्रदर्शन करताना दिसतोय. त्यांची हाराकिरी सुरू असून त्यांना आतापर्यंत हंगामातील सलग ६ सामने गमावले आहेत. असे असले तरीही, मुंबईकडून दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस प्रत्येक सामन्यात प्रभावी खेळी करताना दिसतोय. अशात क्रिकेटजगतात बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेविसने दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सबद्दल मोठा उलगडा केला आहे.
डिविलियर्सने (AB De Villiers) आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी शिकण्यासाठी खूप मदत केली असल्याचे ब्रेविसने (Dewald Brevis) सांगितले आहे. तो म्हणाला (Brevis On De Villers) की, “डिविलियर्सने खूप मोठी भूमिका बजावली आहे. हे खूप खास नाते आहे. तो मला खूप छोट्या-छोट्या गोष्टी शिकवतो, ज्यांची मला मोठ्या प्रमाणात मदत होते. तो मला खेळात साधेपणा ठेवायला सांगतो. त्याने सांगितलेल्या तांत्रिक गोष्टी मला खूप उपयोगी ठरतात.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
१९ वर्षांखालील विश्वचषकात ६ सामन्यांमध्ये ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा करत ब्रेविसने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच्या या खेळीमध्ये २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. याच कामगिरीला प्रभावित होऊन मुंबईने (Mumbai Indians) त्याला ३ कोटींना विकत घेतले होते. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
त्यातही पंजाब किंग्जविरुद्ध राहुल चाहरच्या षटकात सलग चौकार आणि षटकार खेचत त्याने आपली छाप सोडली होती. यादरम्यान त्याने लाँग ऑनवरून ११२ मीटरचा षटकारही ठोकला होता. या तोडफोड खेळीबद्दल प्रतिक्रिया देताना ब्रेविस म्हणाला, “मी वास्तवात याचा भरपूर आनंद घेतला. मी या सामन्यात सर्वांकडून शिकण्याच्या प्रयत्नात होतो. निर्भीड होणे खेळणे आणि स्मार्ट क्रिकेट खेळणे, यासाठी मी प्रयत्नशील होतो.”
तसेच शेवटी त्याने म्हटले की, ड्रेसिंग रूममध्ये मोठमोठ्या दिग्गजांचा सहवास, सचिन तेंडूलकर आणि मुख्य प्रशिक्षक माहेल जयवर्धने यांसारख्या दिग्गजांकडून धडे गिरवणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे.
दरम्यान ब्रेविसने ४ सामने खेळताना २९.२५ च्या सरासरीने ११७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ४९ धावा इतकी राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कब खून खौलेगा रे तेरा! पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर रोहितवर संतापले नेटकरी
मुंबईची लाजिरवाणी कामगिरी! बनला आयपीएलमध्ये ‘हा’ नकोसा विक्रम करणारा तिसरा संघ
ना छेडो हमें हम सतायें हुए है…! मुंबई इंडियन्सच्या सलग सहाव्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचे वारे