इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात पदार्पण केलेल्या दोन संघांनी प्लेऑफमध्ये मजल मारली. त्यातील एका संघाने तर चषकच आपल्या नावे केला आहे. ते दोन संघ म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स. गुजरातचे खेळाडू चॅम्पियन झाल्याने भलतेच खूष दिसले, तर काही संघ प्लेऑफची एक पायरी चढण्याची बाकी असता स्पर्धेबाहेर झाले. त्यातील एक संघ म्हणजे, गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ. दिल्लीकडून खेळणारा मिशेल मार्शला संघ प्लेऑफमध्ये न गेल्याने खूप दु:ख झाले.
त्यांना प्लेऑफसाठी शेवटच्या साखळी फेरी सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, वानेखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीला पाच विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. या पराभवाबरोबरच ते स्पर्धेबाहेर झाले, तर रॉयल चॅलेजर्स बेंगलोर अंतिम चारमध्ये पोहोचला.
अष्टपैलू मार्शने पंधराव्या आयपीएलमध्ये कोरोनातून बरे होऊन नंतरच्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात ६२ चेंडूत ८९ धावा केल्या होत्या. त्याला या आपीएलमध्ये आठच सामने खेळायला मिळाले.
“आम्ही प्लेऑफमध्ये नाही पोहोचलो याचे मला खूप दु:ख झाले. मात्र यावेळी मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटींग यांना खेळाडूंची चिंता आहे हे जवळून दिसले. त्यांनी मला दिल्लीसाठी मी एक महत्वाचा खेळाडू आहे याची जाणीव करून दिली,” असे ३० वर्षीय मार्शने म्हटले आहे.
मार्शला श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात निवडले आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ ७ जून ते १२ जुलै २०२२ दरम्यान २ कसोटी, ५ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे. तसेच त्याला आर्यलंड विरुद्धच्या सामन्यासाठीही संघात स्थान मिळाले आहे. यामध्ये फलंदाजीत उत्तम कामगिरी व्हावी यासाठी त्याने आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. आयपीएलच्या सामन्यांमध्ये मार्शने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्याने ऑस्ट्रेलियासाठीही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची इच्छा दर्शवली आहे.
“मला ऑस्ट्रेलियासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी करणे कठीण असते पण ते अशक्य नसते. मी मागील बारा महिन्यांपासून चांगला सराव सुरू ठेवल्याने मला आता आत्मविश्वास आला मी कोणत्याही संघाविरुद्ध उत्तम खेळू शकतो,” असे मार्शने म्हटले आहे. मार्शने ऑस्ट्रेलियासाठी ३२ कसोटी, ६३ वनडे, ३६ टी२० सामने खेळले आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुणाला ऑटोग्राफ दिले, कुणाशी गप्पा मारल्या, तर कुणाला पॅड्स भेट दिले; नील वॅगनरचं होतंय कौतुक
एकाचं पोट दुखलं, दुसऱ्याची गोलंदाजी नडली; क्रिकेट इतिहासातील एकमेव षटक, ज्यात तिघांनी केली गोलंदाजी
कौतुक करा कौतुक! क्रिकेटला मिळाला दुसरा युवराज, पठ्ठ्याने टी१० लीगच्या एका ओव्हरमध्ये ठोकले ६ षटकार