राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल त्याचा विवाह सोहळा झाल्यानंतर भारतात आयपीएलसाठी दाखल झाला आहे. आरसीबी फ्रॅंचायझीच्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन मॅक्सवेल संघासोबत जोडला गेल्याचे सांगितले आहे. आता तो आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन संघासोबत सराव करणार आहे.
मॅक्सवेल त्याची प्रेयसी विनी रमणबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. या दोघांनी दोन वर्षांपूर्वा साखरपूडा केला होता. विनी ही भारतीय वंशाची आहे. त्यामुळे मॅक्सवेल आणि विनीचे रविवारी (२७ मार्च) भारतीय पद्धतीने लग्न झाले. तसेच त्याआधी १८ मार्च रोजी त्यांनी ख्रिस्ती पद्धतीनेही लग्न केले. लग्नामुळे तो आयपीएलच्या सुरुवातीला उपलब्ध नव्हता.
त्याच्या लग्नानंतर तो लगेचच आयपीएल खेळण्यासाठी येत असल्याने बेंगलोर संघाने त्याचे खास स्वागत केले. त्याच्यासोबत त्याची पत्नी विनी देखील असल्याने या नवविवाहीत दांम्पत्यासाठी बेंगलोरने खास रूम सजवली आहे. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
Checked in for #IPL2022. ✅
Making @Gmaxi_32 feel Safe & Sound and at home! 🙌🏻🤜🏻🤛🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/fAHOJFZbCO
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 1, 2022
फाफ डु प्लेसीसच्या नेतृत्वाखाली आरसीबी आपला पुढील सामना ५ एप्रिलला राजस्थान संघाविरुद्ध खेळणार आहे. परंतु, या सामन्यासाठी मॅक्सवेल उपलब्ध नसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घोषणा केली आहे की, ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू ६ एप्रिलला आयपीएलसाठी भारतात दाखल होणार आहेत.
मॅक्सवेल शुक्रवारी (१ एप्रिल) भारतात दाखल झाला आहे. तो तीन दिवस क्वारंटाइन होणार आहे. ४ एप्रिलपासून तो सराव सुरू करणार आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या आदेशामुळे तो ५ एप्रिलला राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसणार आहे. तो आता ९ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
https://www.instagram.com/p/CbzNQnvB5N3/?utm_medium=copy_link
आरसीबीची संमिश्र सुरुवात
आरसीबी संघाने आयपीएलच्या १५ व्या हंगामात २ सामने खेळले आहेत, पंजाब किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघाला पराभवाला पत्कारावा लागला होता, तर कोलकाताविरुद्धच्या दूसऱ्या सामन्यात संघाने विजय मिळावला. सध्या आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत आरसीबी ७ व्या स्थानावर आहे.
मॅक्सवेलच्या आगमनाने संघाची गोलंदाजी युनिट मजबूत होईल. तसेच तो उत्कृष्ट गोलंदाजी करून अष्टपैलूची भूमिका उत्तम प्रकारे निभावू शकतो. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ९७ सामन्यांत २०१८ धावा केल्या आहेत, यामध्ये १२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजीत देखील ९७ सामन्यांत२२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मागील हंगामात आरसीबीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती. यावर्षी सुद्धा तो उत्तम कामगिरी करेल अशी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना आशा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आझम आणि इमामपुढे फिके पडले ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज, धुव्वादार शतके करत विक्रमांचे रचले मनोरे
गंभीरचं धोनीसोबतचं नातं आहे ‘खंबीर’! लखनऊच्या मेंटॉरने चेन्नईच्या माजी कर्णधाराची घेतली भेट, Photo
IPL2022| कोलकाता वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!