Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमधील ६० सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठा बदल; पंजाबला प्लेऑफमध्ये एंट्री करण्यासाठी कसे आहे समीकरण?

आयपीएलमधील ६० सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठा बदल; पंजाबला प्लेऑफमध्ये एंट्री करण्यासाठी कसे आहे समीकरण?

May 14, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Shikhar-Dhawan

Photo Courtesy: iplt20.com


यंदाच्या आयपीएलच्या १५व्या हंगामातील ६० सामने पूर्ण झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात शुक्रवारी (दि. १३ मे) पार पडलेल्या ६०व्या सामन्यात पंजाबने ५४ धावांनी सामना खिशात घातला. हा पंजाबचा हंगामातील सहावा विजय होता. या विजयानंतर पंजाबने गुणतालिकेत (पॉईंट्स टेबल) मोठा बदल केला आहे. आठव्या स्थानी विराजमान असणारा पंजाब संघाने २ गुणांसह २ स्थानांची झेप घेतली आहे. तसेच, प्लेऑफमधील आपल्या अपेक्षा जिवंत ठेवल्या आहेत.

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर  (Royal Challengers Bangalore)संघापुढील आव्हान वाढले आहे. बेंगलोर संघाने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यातील ७ सामन्यात विजय मिळवत चौथे स्थान काबीज केले आहे. मात्र, त्यांनी पुढील सामना गमावला, तर त्यांचे प्लेऑफचे गणित बिघडू शकते. चला तर जाणून घेऊया पंजाब किंग्स संघ कशाप्रकारे प्लेऑफमध्ये जागा बनवू शकतो.

पंजाब कशाप्रकारे बनवू शकतो प्लेऑफमध्ये जागा?
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाला प्लेऑफचे दार ठोठावण्यासाठी १६ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि २२ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद संघांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. पंजाबसाठी एकही पराभव आव्हानात्मक ठरू शकतो. संघाकडे आता १२ सामन्यातील  ६ विजयानंतर १२ गुण आहेत. आणखी २ विजयांनंतर त्यांचे १६ गुण होतील. यासोबत त्यांचा रनरेटदेखील चांगला होऊ शकतो. पंजाब किंग्स संघाने पुढील २ सामन्यात विजय मिळवला, तर ते प्लेऑफमध्ये जागा बनवू शकतात.

After Match No. 6⃣0⃣ of the #TATAIPL 2022, here's how the Points Table looks 🔽 #RCBvPBKS pic.twitter.com/tCYVb2Z47g

— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाब किंग्सचे आव्हान सोपे नसेल. कारण, १६ गुणांसाठी राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ अजूनही मैदानात आहेत. राजस्थानचे अजून २, बेंगलोरचे १, दिल्लीचे २, हैदराबादचे ३ आणि कोलकाताचे २ सामने शिल्लक आहेत. अशात, पंजाब किंग्सला इतर संघाच्या प्रदर्शनावरही अवलंबून राहावे लागेल.

Reliving a sweet, sweet win ❤️🌟#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #RCBvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ https://t.co/MEg9q0nave

— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 13, 2022

असे असू शकते गणित
एकदाही आयपीएलच्या किताबाची चव न चाखणाऱ्या पंजाब संघाला प्लेऑफमध्ये एंट्री घेण्यासाठी २ विजय मिळवावे लागतील. जर राजस्थान संघ २ सामने पराभूत झाला, बेंगलोर संघ पुढील सामन्यात पराभूत झाला, दिल्ली संघ दोनपैकी एका सामन्यात विजय मिळवला, हैदराबादने तीनपैकी २ सामन्यातच विजय मिळवला आणि कोलकाताने जरी २ सामने जिंकले, तर पंजाबला सहजरीत्या प्लेऑफमध्ये एंट्री मिळेल. अशात, प्लेऑफचे हे गणित रंजक बनले आहे. त्यामुळे आठव्या क्रमांकावर सहाव्या क्रमांकावर उडी घेणारा पंजाब संघ प्लेऑफमध्ये एंट्री घेईल की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

जे १५ वर्षात कुणाला जमलं नाही, ते बेअरस्टोने करून दाखवलं! दिग्गज जयसूर्याच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

‘किंग’ कोहलीचा नावाला साजेसा विक्रम! पंजाबविरुद्ध १ धाव काढताच अद्वितीय विक्रमाला घातली गवसणी

आरसीबीविरुद्ध बेयरस्टोच्या बॅटला लगाम लावणं कठीण! फक्त बाउंड्रीपार चेंडू मारत केलं कारकिर्दीतील जलद अर्धशतक


ADVERTISEMENT
Next Post
All-the-group-winner-and-runner-up-with-guest

एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज: नमिश हूड व शिबानी गुप्ते यांना विजेतेपद

Faf-Du-Plessis-And-Mayank-Agarwal

बेंगलोर-पंजाब सामन्याला मांजरीनेही लावली हजेरी; सामना थांबवत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी घेतली मजा

Virat-Kohli-IPL

'विसरून जा तुझं लग्न झालेलं अन् तुला मुलगी होती', खराब फॉर्मातील विराटला इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ला

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.