---Advertisement---

मोठ्या विजयानंतरही मयंक दिसला नाराज, विराटने काढली समजूत; पाहा दोघांमधील संभाषणाचा Video

On: शनिवार, मे 14, 2022 3:44 PM
Virat-Mayank-Conversation
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात शुक्रवारी (१३ मे) आयपीएल २०२२चा ६०वा सामना झाला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना पंजाबने ५४ धावांनी जिंकला. या मोठ्या विजयानंतरही पंजाब संघाचा कर्णधार मयंक अगरवाल नाखुश दिसला. तो बेंगलोरचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्याशी सामन्यानंतर संभाषण साधताना दिसला.

या सामन्यात (RCB vs PBKS) प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर २०९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बेंगलोरचा संघ २० षटकात ९ विकेट्स गमावत केवळ १५५ धावाच करू शकला. परिणामी पंजाबने ५४ धावा राखून हा सामना खिशात घातला. परंतु बेंगलोरवरील या विजयानंतरही मयंक (Mayank Agarwal) कोणत्या तरी गोष्टीवरून नाराज दिसला. मयंक विराटशी (Virat Kohli) बोलत असताना विराटचे हावभाव पाहण्यासारखे होते. या दोघांमधील संभाषण कॅमेरात कैद झाले असले तरीही, त्यांच्यामध्ये काय बोलणे झाले हे ऐकू आले नाही. परंतु विराट आणि मयंकचे हावभाव पाहून प्रकरण गंभीर असल्याचे दिसत होते.

मयंक कोणत्या तरी गोष्टीबाबत नाराज असून तो विराटला त्याबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. यावर विराट त्याची समजूत काढताना दिसत आहे. शेवटी तो मयंकच्या खांद्यावर हात ठेवून त्याला घेऊन जातानाही (Conversation Between Mayank & Virat) दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून जॉनी बेयरस्टोने ६६ धावा केल्या. त्याच्याखेरीज लियाम लिविंगस्टोनने ७० धावा फटकावल्या. ४२ चेंडू खेळताना ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने त्याने ही मोठी खेळी केली. बेयरस्टो आणि लिविंगस्टोनच्या या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पंजाबने २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर २०९ धावा केल्या. बेयरस्टो आणि लिविंगस्टोनला वगळता पंजाबचे इतर फलंदाज मात्र विशेष योगदान देऊ शकले नाहीत.

प्रत्युत्तरात बेंगलोरकडून एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तसेच रजत पाटीदारनेही २६ धावांचे योगदान दिले. परिणामी बेंगलोरचा संघ १५५ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि त्यांनी हा सामना गमावला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी बोललोय त्याच्याशी…’, अंबाती रायुडूने रिटायरमेंटचे ट्वीट डिलीट केल्यानंतर सीएसकेच्या सीईओंचे स्पष्टीकरण

जॉनी बेअरस्टोने डावाच्या दुसऱ्याच षटकात हेजलवूडला चोपले २ गगनचुंबी षटकार, पाहून विराटही झाला हँग

“मी निवडकर्ता असतो, तर दिनेश कार्तिकला टी२० विश्वचषकासाठी नक्कीच संधी देईल”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---