---Advertisement---

केकेआरचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर; आता ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला केले ताफ्यात सामील

On: शुक्रवार, मार्च 11, 2022 10:17 PM
KKR
---Advertisement---

आयपीएलचा १५ वा हंगाम १५ दिवसांनी म्हणजेच २६ मार्चपासून सुरू होत आहे. हा हंगाम यावेळी भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात पार पडत आहे. या हंगामात १० संघ खेळताना दिसणार आहेत. अशातच दोन वेळचा आयपीएल विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स संघातून मोठी बातमी समोर येत आहे. कोलकाता संघाने या हंगामात इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज ऍलेक्स हेल्सच्या जागी आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचला संघात सामील केले आहे.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेतल्यानंतर हेल्सने (Alex Hales) आयपीएलमधून बाहेर पडण्याचे कारण बायो- बबलमधील थकवा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर कोलकाताने (Kolkata Knight Riders) १.५ कोटी रुपयांच्या किंमतीत फिंचला (Aaron Finch) आपल्या ताफ्यात सामील केले. विशेष म्हणजे, आयपीएल २०२२च्या लिलावात फिंचला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते.

आयपीएल (IPL) वेबसाईटवर हेल्सच्या जागी फिंचला सामील करण्याची माहिती देण्यात आली आहे. फिंचकडे आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ८७ सामने खेळताना ८५ डावात २५.३८ च्या सरासरीने २००५ धावा कुटल्या आहेत. याव्यतिरिक्त फिंचच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ८८ सामने खेळताना ३४.४४ च्या सरासरीने २६८६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ शतके आणि १५ अर्धशतकेही ठोकली आहेत.

आयपीएल २०२२ चा पहिला सामना २६ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. मागील वर्षी आयपीएलचा अंतिम सामनाही चेन्नई आणि कोलकाता संघातच खेळला गेला होता.

ऍरॉन फिंचचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्याच्या उपस्थितीचा केकेआरला फायदा होईल, असे म्हणता येईल. संघातील युवा कर्णधार श्रेयस अय्यरला त्याच्या अनुभवाचा फायदा होईल. अय्यरला आधीच आयपीएलच्या कर्णधारपदाचा अनुभव आहे.

आयपीएल २०२२ साठी कोलकाता नाईट रायडर्स संघ:
पॅट कमिन्स, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण, श्रेयस अय्यर, नितीश राणा, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकूल रॉय, रसिक दार, बी. अभिजित तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, ऍरॉन फिंच, रमेश कुमार, मोहम्मद नबी, उमेश यादव, अमन खान.

महत्त्वाच्या बातम्या-

अफलातून! पाकिस्तानी महिला विकेटकीपरचा ‘अद्भूत’ झेल; चाहत्यांंना आली थेट ‘माही’च्या ‘त्या’ कॅचची आठवण

दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी

दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---