आयपीएल २०२२मधील १२वा सामना सोमवारी (०४ एप्रिल) डी. वाय. पाटील स्टेडिअम मुंबई येथे पार पडला. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळण्यात आला. या सामन्यात लखनऊ संघाने १२ धावांनी विजय मिळवला. लखनऊच्या विजयाचा शिल्पकार आवेश खान ठरला. लखनऊ संघाचा हा आतापर्यंतचा दुसरा विजय होता. पहिल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सविरुद्ध सपाटून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला आणि आता लखनऊ संघाला पराभवाचा धक्का दिलाय. मात्र, संघातील एक खेळाडू असा आहे, ज्याला जवळपास ५ कोटी रुपयांना ताफ्यात सामील करूनही तो सपशेल फ्लॉप ठरत आहे.
कोण आहे तो खेळाडू?
आयपीएल २०२२च्या (IPL 2022) मेगा लिलावात तब्बल ४ कोटी ६० लाखांना लखनऊ (Lucknow Super Giansts) संघाने आपल्या ताफ्यात घेतलेल्या खेळाडूचे नाव आहे मनीष पांडे (Manish Pandey). पांडे या हंगामातील आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये सपशेल फ्लॉप ठरला आहे. गुजरातविरुद्धच्या (Gujarat Titans) पहिल्या सामन्यात तो केवळ ६ धावा करून तंबूत परतला होता. दुसरीकडे चेन्नईविरुद्धच्या (Chennai Super Kings) दुसऱ्या सामन्यातही त्याला खास कामगिरी करता आली नव्हती आणि तो ५ धावांवर तंबूत परतला होता. त्यानंतर हैदराबादविरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) सामन्यात खेळताना तो १० चेंडूवर केवळ ११ धावा करून बाद झाला. या धावा करताना त्याने १ चौकार आणि १ षटकार ठोकला. अशाप्रकारे तो एकूण ३ सामन्यात केवळ २२ धावाच करू शकला.
पांडेला आहे १५० हून अधिक सामन्यांचा अनुभव
मनीष पांडेच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला मोठा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत १५७ सामने खेळले असून त्यात जवळपास ३०च्या सरासरीने ३५८२ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि २१ अर्धशतकेही ठोकली आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा १२१.७१चा राहिलाय. दुसरीकडे त्याच्या टी२० कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २७७ सामन्यातील २५४ डावात फलंदाजी करताना ३२च्या सरासरीने ६३३७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ३ शतके आणि ३६ अर्धशतके केली आहेत. यावेळी त्याने १२३.७९च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे.
मनीष पांडे भारतीय संघाकडूनही खेळला आहे. त्याने २९ वनडे आणि ३९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. वनडेत त्याने ३३.२९च्या सरासरीने ५६६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि २ अर्धशतके केली आहेत. तसेच, टी२०त त्याने ४४.३१च्या सरासरीने ७०९ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ अर्धशतकेही ठोकली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ताकदच बनली कमजोरी! लखनऊच्या फलंदाजांकडून SRHच्या ‘स्पीडस्टार’ उमरान मलिकची धू धू धुलाई
‘सनरायझर्स’चा ‘सनसेट’ करताना लखनऊच्या केएल राहुलची कर्णधार खेळी, नावे केले मोठमोठे विक्रम
LSGvsSRH | आवेशच्या भेदक माऱ्यानंतर होल्डरचा परिपूर्ण शेवट, लखनऊकडून हैदराबाद १२ धावांनी चितपट