---Advertisement---

IPL 2022: फक्त २ कॅच आणि धोनी होणार टी२० क्रिकेटमधील ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील

On: शुक्रवार, मार्च 25, 2022 12:06 AM
MS-Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना २६ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. सीएसके आणि केकेआर या दोन संघांमध्ये २०२१ मध्ये अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात सीएसकेने केकेआरने पराभूत केले होते. सीएसकेने २०२१मध्ये आयपीएलमधील चौथा विजय मिळवला होता. मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ ट्राॅफी जिकल्या आहेत. आयपीएलच्या १५व्या हंगामात सीएसके संघ मुंबईचा विक्रमाशी बरोबरी करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. 

सीएसकेने (CSK) लिलावात अनेक नवीन खेळाडूंवर बोली लावली आणि चांगला संघ तयार केला आहे. तसेच फ्रॅंचायझीने जुन्या खेळाडूंना सुद्धा संघात विकत घेतले आहे. धोनीने आयपीएलला सुरू होण्यास दोन दिवस उरले असताना कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आता रविंद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात तो मोठा विक्रम करू शकतो.

‘कॅप्टन कूल’ धोनी (MS Dhoni) त्याचे २०० झेल पूर्ण करण्यापासून फक्त २ झेल दूर आहे. त्याने जर केकेआरविरुद्धच्या सामन्यात दोन झेल घेतले, तर तो कायरन पोलार्ड, ड्वेन ब्रावो आणि डेविड मिलर यांच्या खास यादीत सहभागी होऊ शकतो. हा सर्व खेळाडूंनी टी२० लीगमध्ये २०० हून अधिक झेल घेतले आहेत. जर धोनीने आणखी २ झेल घेतले, तर अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा खेळाडू ठरेल. त्याने १९८ झेलांपैकी १९३ झेल हे यष्टीरक्षक म्हणून घेतले आहेत.

एक यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक १९३ झेल घेण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. या हंगामात २०० झेल पूर्ण केले, तर तो यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत सुद्धा प्रथम क्रमांकावरच असेल. त्याने १९३ झेलांपैकी ५७ झेल आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये घेतले आहेत.

आयपीएल २०२२ मध्ये धोनी एक खेळाडू म्हणून दिसणार आहे. त्याने आता क्रिकेटच्या सर्व प्रकारामधील कर्णधारपदाच्या राजीनाम्याबरोबरच आयपीएलच्या कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिला आहे. आयपीएल २०२२ मध्ये एकूण १० संघ सहभागी झाले असून लीगचे सर्व सामने मुंबई आणि पुण्यामध्ये पार पडणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! दहशतवाद्यांकडून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमची रेकी? गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

‘मुंबई इंडियन्सला मुंबईत खेळण्याचा होणार नाही फायदा’, असे का म्हणाला ‘पलटण’चा कर्णधार, जाणून घ्या कारण

धोनी वि. जडेजा, हसावं की रडावं अशी आकडेवारी; चेन्नईचे चाहते मोक्कार टेन्शनमध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---