क्रिकेटमध्ये खेळाडूंचा जर्सी नंबर हा त्यांची ओळख असतो. चाहते तर जर्सी पाहूनच खेळाडूंची नावे सांगतात. असाच एक जर्सी नंबर आहे, जो चाहत्यांच्या डोक्यात एकदम फीट बसला आहे. तो जर्सी नंबर म्हणजेच ‘७’ होय. हा जर्सी नंबर ऐकताच डोक्यात सर्वात आधी नाव येतं, ते म्हणजे एमएस धोनी. धोनीने आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसीचे ३ विश्वचषक जिंकून दिले आहेत. दुसरीकडे त्याने चेन्नई सुपर किंग्सला ४ वेळा आयपीएलचा किताब मिळवून दिला आहे. धोनी आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासूनच ‘७’ नंबरची जर्सी वापरत आहे. मात्र, तो हीच जर्सी का वापरतो? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. चला तर जाणून घेऊया यामागील नेमकं गुपीत काय आहे, ते जाणून घेऊया. खुद्द धोनीनेच त्याचे उत्तर दिले आहे.

खरं तर, धोनीचा जन्म सातव्या महिन्यात ७ तारखेला म्हणजेच ७ जुलै, १९८१ रोजी रांची येथे झाला होता. त्यामुळे त्याच्यासाठी ७ हा नंबर खूप भाग्यवान आहे.

अंधश्रद्धा नाहीये ‘जर्सी नंबर-७’
चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) खुलासा केला आहे की, ‘नंबर ७’ हा त्याच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. हा नंबर कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडून ठेवलेला नाही. चेन्नईचे मालक इंडिया सिमेंट्सने आयोजित केलेल्या एका चर्चेदरम्यान चाहत्यांशी संवाद साधताना धोनीने ‘नंबर ७’ निवडण्याबद्दल खुलासा केला.

धोनी म्हणाला की, “खूप लोकांना सुरुवातील विचार केला होता की, नंबर ७ माझ्यासाठी एक भाग्यवान आकडा आहे. सुरुवातीपासूनच एक स्पष्ट कारण होते की, माझा जन्म जुलैच्या ७ व्या तारखेला झाला होता. सातव्या महिन्यातील सातवा दिवस ही एक चांगली संख्या आहे. मी म्हणालो की, मी माझा जन्मदिवसच निवडेल.”

एमएस धोनीच्या कारकिर्दीवर एक नजर
धोनीने १५ ऑगस्ट, २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने ९० कसोटी सामने, ३५० वनडे सामने आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ६ शतके आणि ३३ अर्धशतके ठोकली आहेत. वनडेत त्याने ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतके ठोकली आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ३७.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीचा १०.७५ कोटींच्या हुकमी एक्काचा ‘या’ गोष्टीमुळे वाढलाय आत्मविश्वास, आयपीएल २०२२मध्ये दाखवणार जलवा

‘धोनी, रायुडू आणि उथप्पाने किती क्रिकेट खेळले, हाच प्रश्न आहे’, आगामी आयपीएलपूर्वी दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया

‘असं असतं भावा’, रिषभ पंतने ‘खाबी’ बनत उडवली अक्षर पटेलची खिल्ली, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट