इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५ हंगाम शनिवारी (२६ मार्च) सुरू झाला. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या सामन्यात सीएसके संघाची सुरुवात अपेक्षित होऊ शकली नाही. सीएसकेचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीच्या जाळ्यात अडकला. केकेआरचा यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनने उथप्पाला बाद करण्यासाठी उत्कृष्ट स्टंपिंगाच नमुना सादर केला.
फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) डावाच्या आठव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने अनुभवी रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याला तंबूचा रस्ता दाखवला. षटकातील पाचव्या चेंडूवर उथप्पा स्ट्राइकवर होता आणि चक्रवर्तीचा चेंडू उथप्पाच्या मागच्या बाजूने यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) याच्या हातत गेला. उथप्पा हा चेंडू खेळण्यासाठी दोन पावले पुढे आला होता. इतक्यात यष्टीरक्षाणे संधी साधली आणि केकेआरला महत्वाची विकेट मिळवून दिली.
https://twitter.com/TheAnujDagar/status/1507733388249116684?t=KIXd3eJGZHSG0NR-zQ9JEw&s=19
उथप्पाची विकेट ज्यावेळी केकेआरने घेतली, तेव्हा सीएसकेची धावसंख्या ४९ होती आणि दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते. अशा परिस्थितीत उथप्पाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो अपयशी ठरला. त्याने २१ चेंडूंचा सामना केला आणि २८ धावा केल्या. केकेआरचा यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सन मात्र उथप्पाच्या विकेटनंतर चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने यष्टीपाठी दाखवलेल्या चपळाईचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील ट्वीट करत जॅक्सनचे कौतुक केले.
That was an outstanding stumping. @ShelJackson27’s speed reminded me of @msdhoni.
Lightning fast!! ⚡️#CSKvKKR
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 26, 2022
Brilliant stumping from Sheldon Jackson, beautiful glove work. pic.twitter.com/GS18yLZyHv
— Johns. (@CricCrazyJohns) March 26, 2022
दरम्यान, अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) साठी हा सामना खास ठरला. एमएस धोनीने गुरुवारी (२४ मार्च) अचानक सीएसकेचे कर्णधारपद सोडले आणि जडेजा सीएसकेचा नवीन कर्णधार बनला. तर दुसरीकडे केकेआरला देखील श्रेयस अय्यरच्या रूपात नवीन कर्णधार मिळाला आहे.
केकेआरचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. उमेश यादवने केकेआरसाठी सुरुवातीच्या दोन विकेस्ट घेतल्या. सीएसकेचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (०) आणि डिवॉन कॉन्वे (३) स्वस्तात बाद झाले.
महत्वाच्या बातम्या –
अखेर मेहनत फळाला आली! तब्बल इतक्या सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर जड्डू बनला कॅप्टन
आता कोहलीतील फलंदाज पुन्हा जागा होणार, यंदा तो १००० धावा करणार; माजी कर्णधाराचे भाकीत