इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की, बीसीसीआयला १००० कोटीहून अधिक रुपयांचा फायदा झाला आहे. आयपीएल २०२२ मध्ये स्पाॅन्सरशिप पाहिली तर त्याचा आकडा १००० कोटीच्या पूढे गेला आहे. आयपीएलच्या १४ वर्षांच्या इतिहासात एवढी कमाई कधीच झाली नाही. २६ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात बीसीसीआयला १००० कोटींचा फायदा झाला आहे.
बीसीसीआयने टाटासोबतच टायटल स्पाॅन्सरची डील केली आहे, कारण वीवो कंपनीचा करार संपला आहे. तसेच बीसीसीआयला दोन असोसिएट स्पाॅन्सरही मिळाले आहेत, जे आयपीएल लीग आणखी मोठी झाली असल्याचे दाखवत आहेत. आयपीएल गवर्निंग काउंसिलने रुपे (RuPay) आणि स्वीगी इंस्टामार्ट यांच्यासोबत नवीन डील केली आहे. बीसीसीआयने पहिल्यांदाच हंगामात नऊ स्पाॅन्सरशिप स्लाॅट भरले आहेत.
रुपे आणि स्विगीसोबत वर्षाला ४०-५० कोटींची डील बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयला दूसरा फायदा टायटल्स स्पाॅनसरशिप डीलकडून मिळत आहे. टाटा समूहने ३३५ कोटींची डील केली आहे, जी वीवोच्या डीलपेक्षा कमी आहे. बीसीसीआय यावेळी ३० ते ४० टक्के जास्त कमवणार आहे. सुत्र्यांच्या माहीतीनुसार, हा करार अशा प्रकारे हस्तांतरित करण्यात आला आहे की, सर्व तोटा विवो कंपनीला सहन करावा लागणार आहे.
सुत्रांनुसार बीसीसीआयला फक्त वीवोकडून फायदा होणार नाही तर आयपीएल २०२० आणि आयपीएल २०२३ च्या वाढत्या सामन्यांमुळे पैसे सुद्धा मिळणार आहेत. वीवो कंपनीने आगामी दोन्ही सत्रांमध्ये सामन्यांच्या वाढत्या संख्येनुसार आयपीएल २०२२ मध्ये ४८४ कोटींंची डील तर आयपीएल २०२३ मध्ये ५१२ कोटींची डील करण्याची सहमती व्यक्त केली आहे. वीवोला आगामी दोन हंगामांसाठी बीसीसीआयला ९९६ कोटींची डील करायची होती. आता टाटा समुहाने या कालावधीत ६७० कोटींची डील केली आहे, त्यामुळे तो तोटा विवोला सहन करावा लागणार आहे.
कराराच्या समजूतीनुसार, वीवो बीसीसीआयला ‘ट्रांसफर फीज’ देईल, जसे की अगोदर झाले होते. ओप्पोने बायजूसला आपले राईट्स दिले होते. हे सगळ्या टायटल स्पाॅन्सरशिप स्लाॅटचा बीसीसीआयला ६००० कोटींहून अधिक फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
उद्घाटन सोहळ्याची भरून निघणार कसर! पहिल्या आयपीएल मॅचपूर्वी टोकियो ऑलिंपिक विजेत्यांचा सन्मान
Video: एकत्र क्रिकेट खेळणाऱ्या पोरा-पोरींनी मास्टर-ब्लास्टरला केलं इंप्रेस; सचिन म्हणतोय, ‘खेळ हा…’






