कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने शुक्रवारी (२५ मार्च) त्यांच्या संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यर याचे तोंड भरून कौतुक केले आहे. मॅक्युलमच्या मते श्रेयस अय्यरमध्ये फलंदाजीचे सर्व गुण आहेत आणि तो केकेआरसाठी दशकातील सर्वोत्तम खेळाडू बनू शकतो.
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरला खरेदी करण्यासाठी केकेआर (कोलकाता नाइट रायडर्स) फ्रेंचायझीने १२.२५ कोटी रुपये खर्च केले. केकेआरचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) याच्या मते श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) एक गुणवंत खेळाडू आहे.
मॅक्युलम म्हणाला की, “तो केकेआरचा दशकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू बनू शकतो. आम्हाला कुठुनतरी सुरुवात करायचीच आहे आणि ती उद्या असेल. जगभरात त्याला आदर मिळतो आणि आता त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन येणे बाकी आहे. त्याच्याकडे खेळाचा सुपरस्टार बनण्याचे गुण आहेत आणि मी त्याच्यासोबत काम करण्यासाठी आतूर आहे.”
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्लस संघ आयपीएल २०२० मध्ये स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. आता या हंगामापासून तो दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेला संघ केकेआरचे नेतृत्व करणार आहे. मॅक्युलमच्या मते श्रेयस अय्यर आणि त्याचा स्वभाव एकसारखा आहे. त्याच्या मते ते दोघेही आक्रमक अंदाजात फलंदाजी करतात.
“आम्हा दोघांचीही खेळाविषयी मानसिकता एकसारखी आहे. आम्ही सर्वजण मिळून हा प्रवास पूर्ण करू आणि केवळ परिणामांवर लक्ष न देता गुणांवर लक्ष देऊ.” असे मॅक्युलम पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, आयपीएल २०२२ च्या पहिल्याच सामन्यात केकेआर त्यांच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. मागच्या वर्षी सीएसके आणि केकेआर हे संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते आणि या हंगामाची सुरुवात याच दोन संघांतील सामन्याने होईल. केकेआर आणि सीएसके यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जाईल, जो रात्री ७.३० वाजता सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –