इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना शनिवारी (२६ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. ५ वेळा आयपीएल ट्राॅफी जिंकलेला मुंबई संघ २७ मार्चपासून आयपीएल अभियानाची सुरुवात करणार आहे. संघ आपला पहिला सामना ब्रेबोर्न स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे. मुंबईजवळ सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज आहे, ज्याने फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार खेळी खेळली होती.
भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर(Sunil Gavaskar) म्हणाले की, “सूर्यकुमार यादवसाठी आयपीएल २०२२(IPL 2022) मध्ये शानदार कामगिरी करुन भारतीय संघात स्थान निश्चीत करण्याची मोठी संधी आहे. पाच वेळा आयपीएल चषक जिंकलेला मुंबई संघ २७ मार्चला पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघासोबत भिडेल. यावेळी सर्वांचे लक्ष सूर्यकुमार यादववर असणार आहे. ज्याने मागील आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती.”
सुनील गावसकर म्हणाले, “सूर्यकुमारसाठी मागील हंगाम शानदार होता. तसेच त्याच्याकडे आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात स्थान पक्के करण्याची मोठी संधी आहे. टी२० विश्वचषकासाठी संघाची निवड ही आयपीएलमधूनच केली जाते. त्यामुळे यादवला ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या या विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे.”
ऑस्ट्रेलियन फलंदाज डेविड वाॅर्नरबद्दल बोलताना गावसकर म्हणाले, “वॉर्नरच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, त्याला स्वतःशिवाय इतर कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. मागील वर्ष त्याच्यासाठी चांगले नव्हते, परंतु यावेळी तो दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली कामगिरी करेल.” तसेच गावसकर यांनी सीएसकेचा कर्णधार जडेजाबाबतही आपले मत मांडले आहे.
आयपीएल २०२२ साठी मुंबई संघ-
रोहित शर्मा(कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थम्पी, मुरुगन अश्विन, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय , एन. तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डेनियल सॅम्स, टायमल मिल्स, टिम डेविड, रिले मेरेडिथ, अनमोलप्रीत सिंह, अरशद खान, रमनदीप सिंह, राहुल बुद्धि, रितिक शौकीन, अर्जुन तेंदुलकर, आर्यन जुयाल, फैबियन एलन.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! २०२३मध्ये होणार ‘महिला आयपीएल’, ६ संघांमध्ये स्पर्धा घेण्याचे बीसीसीआयचे नियोजन
ऑस्ट्रेलियाने ‘करुन दाखवलं’, पाकिस्तानला त्यांच्याच मातीत लोळवलं; कसोटी मालिका १-० जिंकली
धोनीने सीएसकेची कॅप्टन्सी सोडल्यानंतर व्हायरल होतोय ‘हा’ जुना व्हिडिओ, पाहा काय म्हणालाय ‘थाला’