आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याने झाली. सीएसकेसाठी या सामन्यात एमएस धोनीने अप्रतिम प्रदर्शन केले, पण केकेआरने सोपा विजय मिळवला. केकेआरने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये सीएसकेला मात दिली. केकेआरचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सनने अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने यष्टीपाठे दाखवलेल्या चवळाईसाठी त्याचे कौतुक होत आहे. भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगनेही जॅक्सनचे कौतुक केले आहे आणि सोबतच एक मोलाचा सल्लाही दिला आहे.
शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) याने यष्टीपाठी दाखवलेल्या चपळाईमुळे सीएसकेचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला तंबूत परतावे लेगले. डावाच्या आठव्या षटकात वरूण चक्रवर्ती गोलंदाजी करत होता. चक्रवर्तीने टाकलेला चेंडू उथप्पाच्या पायांच्या मागून यष्टीरक्षक जॅक्सनच्या हातात गेला. जॅक्सनने क्षणाचाही विलंब न करता तो चेंडू पकडला आणि स्टंपिंग गेली. परिणामी उथप्पाला मैदान सोडावे लागले. जॅक्सनचे प्रदर्शन पाहून चाहते आणि क्रिकेटचे जाणकार त्याची तुलना एमएस धोनीशी करू लागले. या सत्रात माजी अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) यानेही त्याचे कौतुक केले आहे.
युवराजने स्वतःच्या अधिकृत्व ट्वीटर खात्यावरून ट्वीट करून लिहिले की, “प्रिय शेल्डन जॅक्सन फिरकी गोलंदाजीवर यष्टीरक्षक करताना कृपया हेल्मेट घाल. तू खूप प्रतिभावान खेळाडू आहे आणि तुला खूप दिवसांनी सुवर्णसंधी मिळाली आहे. सुरक्षित राहा, आणि वाटचालीसाठी शुभेच्छा.”
शेल्डन जॅक्सन हे नाव जरी विदेशी खेळाडूचे वाटत असले, तर तो एक भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतो. तो यापूर्वी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळला आहे.
सामन्याचा विचार केला, तर सीएसेकचा माजी कर्णधार एमएस धोनी याने प्रथम फलंदाजी करताना मोठ्या काळानंतर स्वतःचे अर्धशतक केले. परंतु, सीएसकेचा दुसरा एकही खेळाडू अर्धशतकी खेळी करू शकला नाही. कर्णधार रवींद्र जडेजा २६, तर रॉबिन उथप्पा २८ धावा करून बाद झाले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड एकही धाव करू शकला नाही, तर डेवॉन कॉन्वे ३ धावा करून तंबूत परतला.
प्रत्युत्तरात केकेआरसाठी सलामीवीर अजिंक्य रहाणेने ४४ धावा करून चांगली सुरुवात दिली. सॅम बिलिंग्स २५ धावांसह दुसरा सर्वात मोठी खेळी करणारा खेळाडू ठरला. गोलंदाजांमध्ये केकेआरसाठी अनुभवी उमेश यादवने २० धावा खर्च करून सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. यासाठी उमेशला सामनावीर निवडले गेले. केकेआरसाठी ड्वेन ब्रावोने २० धाव खर्च करून ३ विकेट्स घेतल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या –
PBKS vs RCB| दोन नव्या कर्णधारांची कसोटी, अशी असू शकते पंजाब-बेंगलोर संघांची प्लेइंग इलेव्हन
IPL2022| मुंबई वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
ड्वेन ब्रावो बनला ‘नंबर १’, आयपीएलमधील मोठ्या विक्रमात लसिथ मलिंगाशी साधली बरोबरी