इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा २२वा सामना चेन्नई सुपर किंग्जने २३ धावांनी जिंकला. सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी केली आणि मोठी धावसंख्या उभारली. आरसीबीला मर्यादित धावसंख्येवर रोखले. सीएसकेसाठी त्यांचा सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या शिवम दुबेने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. सोबत या दोघांच्या नावावर एक मोठा विक्रम देखील झाला आहे.
सीएसकेला आरसीबीविरुद्ध मिळालेल्या या विजयात रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि शिवम दुबे (Shivam Dube) या दोघांचे योगदान सर्वात मोठे ठरले. उथप्पाने ५० चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ८८ धावा केल्या, तर दुसरीकडे शिवम दुबेने अवघ्या ४६ चेंडूत ९५ धावांची दमदार खेळी केली. या धावा करण्यासाठी दुबेने ५ चौकार आणि ८ षठकार ठोकले. या दोघांनी सामन्यात १६५ धावांची भागीदारी केली आणि सीएसकेला मर्यादिक २० षटकांमध्ये २१६ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएलमधील ही सर्वात ऐतिहासिक भागीदारी ठरली आहे.
S-R power combo in the middle upping the SR!💪#CSKvRCB #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/NQ5jwsJRnp
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 12, 2022
दक्षिण अफ्रिकी अष्टपैलू मोईन अली बाद झाल्यानंतर शिवम दुबे मैदानात आला. दुबे आणि उथप्पा या जोडीने सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली, जी सर्वोत्तम ठरली. आयपीएलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्यांच्या यादीत उथप्पा आणि शिवम दुबे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर कुमार संगकारा आणि कॅमरॉन व्हाइट आहेत, ज्यांनी आयपीएल २०१२मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी १५७ धावा जोडल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन. या दोघांनी आयपीएल २०२०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना १५२ धावांची नाबाद भागीदारी पार पाडली होती. चौथ्या क्रमांकावर ऍल्बी मॉर्केल आणि मुरली विजय आहेत, ज्यांनी २०१०मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भागादारी केली होती.
दरम्यान, सीएसके आणि आरसीबी (CSK vs RCB) यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर सीएसकेने उत्कृष्ट प्रदर्शन करून चालू आयपीएल हंगामातील पहिला विजय मिळवला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ४ विकेट्सच्या नुकसानावर २१६ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात आरसीबीला २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा करता आल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘संघ योग्य दिशेने पुढे चाललाय, मलाही प्रभाव पाडायचाय’, दिल्लीच्या धाकड खेळाडूचं वक्तव्य
शेवटी खातं उघडलंच! आरसीबीला २३ धावांनी नमवत सीएसकेने नोंदवला हंगामातील पहिला विजय
मुंबईच्या ताफ्यातील युवा खेळाडूंना बूम बूम बुमराहचा मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘आता इतिहास विसरा…’