---Advertisement---

इकडं धोनी ३६० डिग्री फिरला, अन् तिकडं चाहत्यानं पकडलं डोकं; व्हिडिओ जोरदार व्हायरल

MS-Dhoni
---Advertisement---

शनिवारी (९ एप्रिल) आयपीएलच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात ८ विकेट्स राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने या सामन्यात निराशाजनक फलंदाजी केली. एमएस धोनीने ६ चेंडू खेळले आणि यामध्ये अवघ्या ३ धावा करून विकेट गमावली. धोनीने ज्या पद्धतीने विकेट गमावली, त्याविषयी सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

सनरायझर्स हैदराबादचा युवा गोलंदाज मार्को जेन्सेन गोलंदाजी करत असताना एसएस धोनी (MS Dhoni) मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात दिसला. याच प्रयत्नात त्याने स्वतःची विकेट स्वस्तात गमावली. ही घटना सीएसकेच्या डावाच्या १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर घडली. या चेंडूवर धोनीने त्याची बॅट भिरकावली आणि चेंडूला सीमारेषेपार पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न दिसला. परंतु असे होई शकले नाही. त्याने मारलेला चेंडू थेट उमरान मलिकच्या हातात गेला आणि त्यानेही कसलीच चूक न करता तो झेलला. हा शॉट मारताना धोनी ३६० डिग्री फिरल्याचेही पाहायला मिळाले.

धोनीने हा शॉट खेळल्यानंतर स्टॅन्डमध्ये बसलेल्या सीएसकेच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या. काही चाहत्यांनी निराशेमध्ये डोक्याला हात लावल्याचे दिसले, तर काही चाहते धोनी बाद झाल्यामुळे खूपच निराश दिसले. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

https://twitter.com/mohitherapy/status/1512761744694792192?s=20&t=Itf_05QtK1fVKTCAZUkUWA

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशात सीएसकेला प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरत सनरायझर्स हैदराबादने हे लक्ष्य २ विकेट्सच्या नुकसानावर आणि १७.४ षटकांमध्ये गाठले. सीएसकेसाठी अष्टपैलू मोईन अलीने सर्वाधिक ४८ धावा केल्या. हैदराबादसाठी वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. सनरायझर्ससाठी त्यांचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने सर्वाधिक ७५ धावांचे योगदान दिले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

“राहुल तेवतियाच्या मूर्तीची पंजाब संघाने पुजा केली पाहिजे”

पहिल्या चारही पेपरात ‘कर्णधार’ जडेजा ‘नापास’! अपयशी विद्यार्थ्यांच्या ‘त्या’ यादीत थेट दुसऱ्या स्थानावर

अखेर हैदराबादचा ‘सनराईज’, चेन्नईवर ८ विकेट्सने चारीमुंड्या चित; अभिषेक शर्मा विजयाचा शिल्पकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---