सनरायझर्स हैदराबाद संघाने २०२२ च्या हंगामात दोन सामने खेळले असून दोनही सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचा युवा गोलंदाज कार्तिक त्यागी सध्या संघासोबत नेट्समध्ये सराव करताना दिसत आहे. त्याला सराव करताना संघाचा अनुभवी गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) सल्ला दिला आहे. स्टेन सध्या हैदराबाद संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी निभावत आहे. कार्तिकला हैदराबादने लिलावात ४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
हैदराबादने भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक यांसारख्या गोलंदाजांशिवाय कार्तिक त्यागीला संघात घेतले आहे. कार्तिकने मागील हंगामात राजस्थान राॅयल्सकडून खेळताना महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने १४० प्रति तास वेगाने गोलंदाजी करताना फलंदाजांना त्रासून सोडले होते. कधी कधी त्याने १४५ प्रति तास वेगाने सुद्धा गोलंदाजी केली आहे.
हैदराबादच्या सोशल मीडिया आकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये संघाचे प्रशिक्षक स्टेन युवा खेळाडूंसोबत बोलताना दिसत आहे. व्हिडीओत स्टेन २१ वर्षीय कार्तिकला सल्ला देताना म्हणाले, ‘फक्त हळू हळू. तू फरारी आहेस, तू पहिल्या घेरमध्ये उतरतोस, सहाव्या घेरमध्ये नाही. हळू हळू परंतु निश्चित रुपात, मला वाटते की तू सहाव्या घेरमध्ये पोहचावेस,’
https://www.instagram.com/p/CcE6djMFY2S/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
हैदराबाद संघाची या हंगामाची सुरुवात काही खास झाली नाही. संघ आत्तापर्यंत दोनही सामने पराभूत झाला आहे. या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक स्टेन शानदार सुरुवात करु शकले नाहीत, कारण राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी २१० धावा सहज होऊ दिल्या. केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली संघ ६१ धावांनी पराभूत झाला.
कार्तिक त्यागी म्हणाला, “सर्वात अगोदर मी सर्व संघातील खेळाडूंना भेटलो. मी प्रशिक्षक डेल यांना भेटलो, मी त्यांच्या सोबत काम करण्यासाठी उत्साहित होतो. पहिले सत्र थोडे थकवा देणारे होते, परंतु संघात समाविष्ट झाल्यानंतर चांगले वाटले. मी दिनचर्या पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहे. मी जास्त षटके टाकण्याचा प्रयत्न केला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मी याॅर्करचा अभ्यास करत आहे आणि नव्या चेंडूने गोलंदाजी करत आहे.” हैदराबाद संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मयंकच्या थंडावलेल्या बॅटमधून दिग्गजाला गुजरातविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा; म्हणाला, ‘आता वेळ आलीय…’
Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील आतापर्यंतचे ९ धक्कादायक निकाल, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Kesari | मोठी बातमी! साताऱ्यात अवकाळी पाऊस, महाराष्ट्र केसरी स्पर्धा तात्पुरत्या स्थगित