---Advertisement---

IPL 2022 | नवीन इनिंग सुरू करण्यासाठी डेल स्टेन भारतात दाखल, यंदा दिसणार ‘या’ भूमिकेत

Dale-Steyn
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन आयपीएलच्या आगामी २०२२ (IPL 2022) हंगामात एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामापर्यंत स्टेन सनरायझर्स हैदराबादचा महत्वाचा गोलंदाज होता. आयपीएल २०२२ मध्ये मात्र तो सनरायझर्स हैदराबादच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. गुरुवारी (१७ मार्च) स्टेन भारतात दाखल झाला.

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात डेल स्टेन (Dale Steyn) निवृत्त झाल्यानंतर आता तो सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) सोबत कारकिर्दीतील एका नवीन अध्यायाची सुरूवात करत आहे. सनरायझर्स हैदरबादच्या सपोर्ट स्टाफचा विचार केला, तर त्यामध्ये महान दिग्गजांचा समावेश आहे. स्टाफमध्ये मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत टॉम मूडी, फलंदाजी प्रशिभकाच्या भूमिकेत ब्रायन लारा, तसेच फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांचा समावेश आहे. आता डेल स्टेन वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका सांभाळेल.

सनरायझर्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओत स्टेनने प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओत तो म्हणाला, “होय, पुन्हा येऊन खूप आनंदी आहे. मी काही काळ भारतात राहिलो आहे, त्यामुळे पुनरागमन करून खूप आनंदी आहे. विमानतळावरून गाडी चालवताना अनेक आठवणी ताज्या झाल्या.”

“मी याठिकाणी आधीही आलो आहे. दक्षिण अफ्रिका संघासोबत किंवा आयपीएल संघासोबत, त्यामुळे खूप उत्सुक आहे. माझ्यासाठी प्रशिक्षकाची ही भूमिका नवीन आहे, ज्यासाठी मी खरोखर खूप उत्सुक आहे. खेळाडूंना पाहण्याची ही पूर्णपणे नवीन पद्धत आहे, जी खूप छान आहे. मी मैदानात उतरण्यासाठी तयार आहे,” असेही स्टेन पुढे बोलताना म्हणाला.

दरम्यान, डेस स्टेन आयपीएलच्या इतिसाहासातील एक दिग्गज गोलंदाज राहिला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबात संघासाठी ९५ सामने खेळले आणि यामध्ये ९७ विकेट्स घेतल्या. मागच्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. निवृत्ती नंतर मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकादरम्यान स्टेनने समालोचकाची भूमिका पार पाडली होती. स्टेनच्या कसोटी कराकिर्दीचा विचार केला, तर ती २०१९ मध्येच संपली होती, जेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

महत्वाच्या बातम्या –

आरसीबीचा १०.७५ कोटींच्या हुकमी एक्काचा ‘या’ गोष्टीमुळे वाढलाय आत्मविश्वास, आयपीएल २०२२मध्ये दाखवणार जलवा

‘असं असतं भावा’, रिषभ पंतने ‘खाबी’ बनत उडवली अक्षर पटेलची खिल्ली, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

क्या बात है! वेस्ट इंडिजविरुद्ध स्टोक्सच्या बॅटमधून धावांचा पाऊस; ‘या’ विक्रमात रोहितलाही टाकलंय मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---