इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये पंधरावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली संघ हा सामना जिंकत हंगामातील त्यांचा दुसरा विजय नोंदवण्यासाठी आतुर असेल. तर लखनऊचा संघ विजयाची हॅट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील असेल. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर दिल्ली संघासोबत जोडला गेला आहे. मात्र त्याला या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची फार कमी शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट विशेषज्ञ ब्रॅड हॉग यांचे म्हणणे आहे की, दिल्ली संघ लखनऊविरुद्ध (DC vs SLG) वॉर्नरला (David Warner) संधी देणार असेल, तर त्याने या सामन्यात चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता फार कमी आहे. कारण लखनऊच्या संघात रवी बिश्नोईसारखा (Ravi Bishnoi) गोलंदाज आहे, जो डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक गोलंदाजी करतो. त्यामुळे वॉर्नरही त्याच्या जाळ्यात सापडू शकतो.
विशेष म्हणजे, बिश्नोईविरुद्ध वॉर्नरला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. कारण बिश्नोईने आतापर्यंत वॉर्नरला २ वेळा आपली शिकार बनवले आहे. याखेरीज कृणाल पंड्या आणि जेसन होल्डरचेही आव्हान वॉर्नरपुढे असेल. तसेच एँड्य्रू टाय आणि आवेश खान या लखनऊच्या हुकुमी गोलंदाजांपुढे वॉर्नर कसे प्रदर्शन करतो, यावरही सर्वांच्या नजरा असतील. वॉर्नर पहिल्यांदाच या गोलंदाजांना सामोरे जाईल.
लखनऊच्या टॉप-५ गोलंदाजांविरुद्ध डेविड वॉर्नरची कामगिरी-
जेसन होल्डर – धावा २८, चेंडू २७, विकेट १, स्ट्राईक रेट १०३.७
एँड्य्रू टाय- आतापर्यंत खेळला नाही
आवेश खान- आतापर्यंत खेळला नाही
रवि बिश्नोई- धावा ५, चेंडू ४, विकेट २, स्ट्राईक रेट १२५
कृणाल पंड्या- धावा ३८, चेंडू २४, विकेट ०, स्ट्राईक रेट १५८.३
आजच्या सामन्यासाठी यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
दिल्ली कॅपिटल्स संघ: पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मनदीप सिंग, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रहमान, अश्विन हेब्बर, टिम सिफर्ट, मिशेल मार्श, श्रीकर भरत, सरफराज खान, लुंगी एन्गिडी, प्रवीण दुबे, एन्रिच नोर्किया, कमलेश नागरकोटी, चेतन साकारिया, रिपल पटेल, यश धुल, विकी ओस्तवाल.
लखनऊ सुपर जायंट्स संघ: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एव्हिन लुईस, मनिष पांडे, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान, शाहबाज नदीम, मनन वोहरा , दुश्मंथा चमीरा, काइल मेयर्स, अंकित राजपूत, कृष्णप्पा गॉथम, मार्कस स्टॉयनिस, मोहसिन खान, करण शर्मा, मयंक यादव.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईचा पराभव तर झालाच, पण रोहित शर्माच्या नावावर या नकोशा विक्रमाचीही नोंद, वाचा सविस्तर
MI vs KKR| नितीश राणा अन् जसप्रीत बुमराहला महागात पडली चूक; झाली मोठी कारवाई