ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज वॉर्नर पुन्हा एकदा दिल्लीच्या ताफ्यात सामील; कर्णधाराकडून शिकायचाय ‘हा’ शॉट

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज वॉर्नर पुन्हा एकदा दिल्लीच्या ताफ्यात सामील; कर्णधाराकडून शिकायचाय 'हा' शॉट

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वार्नर आयपीएल २०२२साठी उपस्थित झाला आहे. गुरुवारी (७ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सच्या फ्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्यासाठी उपलब्ध असणार आहे. वॉर्नरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्ली कॅपिटल्ससोबतच केली होती आणि आता पुन्हा एकदा याच संघाकडून खेण्याची संधी त्याला मिळणार आहे. जुन्या संघासोबत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तो उत्सुक आहे.

मागच्या वर्षीपर्यंत सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा डेविड वॉर्नर (David Warner) आयपीएल २०२२च्या मेगा लिलावानंतर दिल्ली कॅपिटल्समध्ये सहभागी झाला. त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २००९मध्ये दिल्ली संघासोबतच झाली होती. आता तो पुन्हा एकदा निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. याविषयी बोलताना वॉर्नर म्हणाला की, “फ्रँचायझीत पुन्हा येणे रोमांचक आहे, ज्यांनी माझ्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मोठी भूमिका पार पाडली आहे. आसपास काही परिचित चेहरे आहेत आणि काही नवीन चेहरे आहेत. त्यामुळे मी या संघासोबत सहभागी होण्यासाठी उत्साहित आहे.”

दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व रिषभ पंतच्या हातात आहे. याविषयी बोलताना वार्नर म्हणाला की, “मला रिषभकडून एका हाताने शॉट खेळायला शिकायचे आहे. तो नेतृत्व करण्यासोबतच शिकणारा युवा खेळाडू आहे. तो भारतीय संघाचा एक अविभाज्य भाग आहे. मी उत्साहित आहे आणि मी मध्यक्रमात त्याच्यासोबत फलंदाजी करण्यासाठी वाट पाहू शकत नाही.”

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) प्रशिक्षकपदी कार्यरत असून वॉर्नर त्याच्या मार्गदर्शनात खेळण्यासाठीही उत्सुक आहे. तो म्हणाला, “रिकीला दिल्ली कॅपिटल्ससोबत खूप काळ झाला आहे. तो ऑस्ट्रेलियाचा एक महान लिडर होता आणि आता एका प्रशिक्षकाच्या रूपात त्याला खूप महत्व आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्साहित आहे.”

दिल्ली कॅपिटल्सला त्यांचा पुढचा सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत खेळायचा आहे, जो गुरुवारी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याविषयी बोलताना वॉर्नर म्हणाला की, “आम्हाला फक्त आमचे सर्वश्रेष्ट प्रदर्शन करायचे आहे आणि एक पूर्ण खेळ खेळण्याची गरज आहे. फिल्डिंग खेळाचे एक मोठे कारण आहे आणि जर आम्ही आमचे झेल आणि क्षेत्ररक्षण चांगले केले, तर आम्ही या स्पर्धेत खूप पुढे जाऊ शकतो.”

वॉर्नरच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १५० सामने खेळले असून त्यात त्याने ४१.६च्या सरासरीने ५४४९ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, नॉर्कियाने २४ आयपीएल सामने खेळताना ७.६५च्या इकॉनॉमी रेटने ३४ विकेट्स घेतल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल

‘मीच हैराण आहे’, मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी खेळीबद्दल कमिन्सचे मोठे भाष्य

चेन्नई पुढे मुंबई मागे-मागे, IPLमध्ये दोन्ही संघाबाबत काही गोष्टी पहिल्यांदाच घडल्यात, वाचा…

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.