---Advertisement---

रिकी पाँटिंगला ‘या’ खेळाडूमध्ये दिसतोय भारताचा भावी कर्णधार, रोहितशी तुलना करत सांगितले साम्य

On: शनिवार, मार्च 26, 2022 7:24 PM
Ricky-Ponting
---Advertisement---

दोन वेळा विश्वचषक विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार रिकी पाॅटिंगने रिषभ पंतच्या कर्णधारपदाबाबत आपले मत मांडले आहे. त्याने भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला भविष्यात जर संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली तर तो यशस्वी कर्णधार होऊ शकतो, असे म्हटले आहे. रिषभ पंतला मागील वर्षी श्रेयस अय्यरला दूखापत झाल्यामुळे आयपीएल फ्रॅंचायझी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्यात आले होते. पाॅंटींगच्या नेतृत्वाखाली संघ व्यवस्थापणाचा या खेळाडूवर पुर्ण विश्वास आहे. 

पॉंटिंगने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल २०२२ (IPL 2022) पुर्वी सांगितले की, “आयपीएलसारख्या दबावाच्या स्पर्धेत या भुमिकेत अनुभव मिळवल्यानंतर मला काही शंका नाही की, येणाऱ्या काळात रिषभ आंतरराष्ट्रीय कर्णधार होऊ शकतो. यामध्ये मला कसलीही शंका नाही.”

पॉंटिंगला असे सुद्धा वाटते की, “पंत आणि पाचवेळा मुंबई इंडियन्स संघाला चॅम्पियन बनवणारा कर्णधार रोहित शर्मामध्ये अनेक समानता आहेत. त्याने रोहितची कारकिर्द पाहिली आहे, ज्यामध्ये तो संघाला सर्वाधिक वेळा आयपीएल ट्राॅफी जिंकवून देणारा कर्णधार बनला आहे.”

पुढे पाँटिंग म्हणाला की, “मी याबाबतीत जास्त विचार केला नाही, परंतु मला वाटते की वास्तवात त्यांच्यामध्ये बरीच समानता आहेत. जेव्हा रोहित पहिल्यांदा संघाचा कर्णधार होता, तेव्हा तो खुप युवा होता आणि त्याने त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जवळपास सुरुच केली होती. तेव्हा तो २३-२४ वर्षांचा असेल आणि रिषभचे वय एवढेच आहे. या दोघांमध्ये खुप समानता आहेत. मला माहित आहे की, हे दोघे चांगले मित्र आहेत आणि ते कर्णधारपदाबाबत काही चर्चा सुद्धा करत असतील.”

आयपीएल २०२२ चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये २६ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. तर २७ मार्चला रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई आणि रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघामध्ये आयपीएलचा दूसऱा सामना पार पडणार आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

CSK Anthem Song | सीएसकेचे नवे अँथम सॉन्ग रिलीज, धांसू अंदाजात दिसतोय ‘थाला’; Video पाहिलाय का?

रैनाची नवी इनिंग, तर शास्त्रींचे पुनरागमन; ‘हे’ १० दिग्गज समालोचनाद्वारे करणार आयपीएलप्रेमींचे मनोंरजन

Video: मुंबई इंडियन्सचे सरप्राईस पाहून आठवणीत रमला सचिन तेंडुलकर; विनोद कांबळीचीही खास प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---