मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३२ वा सामना बुधवारी (२० एप्रिल) होणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार असून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल, तत्पूर्वी ७.०० वाजता नाणेफेक पार पडेल. दरम्यान या सामन्यासाठी कशी फँटसी ११ असू शकते याचा आढावा घेऊ.
असा असू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा संभावित संघ
रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) त्यांनी आत्तापर्यंत ५ सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहेत. तसेच ३ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान त्यांना आता ६ वा सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे.
या सामन्यासाठी दिल्लीच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (DC Predicted XI) विचार करायचा झाल्यास सलामीला पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांची जोडी कायम राहू शकते. तसेच मधल्या फळीत रिषभ पंत, रोवमन पॉवेल, ललित यादव यांच्याबरोबर टीम सिफर्ट यांना संधी मिळू शकते. तसेच फिरकीपटू अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावताना दिसू शकतो. तसेत गोलंदाजीत शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रेहमान आणि खलील अहमद यांना संधी मिळू शकते.
दिल्ली कॅपिटल्सचा संभावित संघ – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, ललित यादव, टीम सिफर्ट, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रेहमान, खलील अहमद.
असा असू शकतो पंजाब किंग्सचा संभावित संघ
मयंक अगरवालच्या (Mayank Agarwal) नेतृत्वातील पंजाब किंग्सने आयपीएल २०२२ हंगामात ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत, तर ३ सामने पराभूत झाले आहेत. आता त्यांना सातवा सामना रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी पंजाबच्या ११ जणांच्या संघात (PBKS Predicted XI) बदल होण्याची शक्यता कमी आहे. कदाचीत या सामन्यासाठी नियमित कर्णधार मंयक अगरवालला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या पायाच्या बोटांना दुखापत झाली आहे. त्यामुळे शिखर धवन (Shikhar Dhawan) सामन्यात नेतृत्व करताना दिसू शकतो.
तसेच पंजाबच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल विचार करायचा झाल्यास शिखरबरोबर प्रभसिमरन सिंग सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो. तसेच मधली फळी जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा आणि शाहरुख खान सांभाळू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून ओडीयन स्मिथ असेल, तर गोलंदाजीत कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते.
पंजाब किंग्सचा संभावित संघ – शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, ओडीयन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग
अशी असेल ड्रीम ११
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स (Delhi Capitals vs Punjab Kings) संघात होणाऱ्या सामन्यासाठी ड्रीम ११ चा (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला संधी मिळू शकते. तसेच फलंदाजीत डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, शाहरुख खान, पृथ्वी शॉ यांची निवड होऊ शकते. अष्टपैलू खेळाडूंमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन आणि अक्षर पटेल यांना संधी दिली जाऊ शकते. तर गोलंदाजीत कुलदीप यादव, कागिसो रबाडा, शार्दुल ठाकूर, राहुल चाहर यांची निवड करू शकतो. कर्णधार म्हणून लियाम लिव्हिंगस्टोनला निवडू शकतो. तसेच उपकर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नरवर विश्वास ठेवू शकतो.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स (DC vs PBKS) ड्रीम ११
कर्णधार – लियाम लिव्हिंगस्टोन
उपकर्णधार – डेव्हिड वॉर्नर
यष्टीरक्षक – रिषभ पंत
फलंदाज – डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, शाहरुख खान, पृथ्वी शॉ
अष्टपैलू – लियाम लिव्हिंगस्टोन, अक्षर पटेल
गोलंदाज – कुलदीप यादव, कागिसो रबाडा, शार्दुल ठाकूर, राहुल चाहर
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘माझ्याशी लग्न करशील का?’ महिला चाहतीचा श्रेयस अय्यरला थेट प्रश्न, Photo भन्नाट व्हायरल
IPL 2022| लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुलला मोठा दंड, तर स्टॉयनिसलाही फटकारलं, वाचा नक्की काय झालं
डू प्लेसिस आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ९६ बाद झाला नाही, यापूर्वीही झालंय अगदी असंच, वाचा सविस्तर