इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. चाहते आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वी सर्व संघ आयपीएलची तयारी करत आहेत. मुंबई इंडियन्स संघ सुद्धा सहाव्यांदा आयपीएलचा चॅम्पियन संघ होण्यास तयार झाला आहे. आयपीएलच्या अगामी हंगामात ८ नव्हे तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. यामुळे ही लीग रोमांचक होऊ शकते. दरम्यान मुंबई संघाने सोशल मिडीयावर खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सरावादरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई फ्रॅंचायझीच्या (Mumbai Indians) ट्वीटर आकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये संघाचा दिग्गज फलंदाज कायरन पोलार्ड आणि ‘बेबी डिविलियर्स’ नावाने ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस मोठे शाॅट खेळताना दिसत आहेत. त्यांना जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना दिसत आहे.
मुंबईने असे अनेक व्हिडीओ आपल्या सोशल मिडीया आकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये संघातील खेळाडू मैदानात सरावासह मस्ती करताना दिसत आहेत. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स संघाने डेवाल्ड ब्रेविसला ३ कोटी रुपयांना खरेदी केले आहे; तर कायरन पोलार्डला ६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
Exquisite shots, yorkers and class! ????
????️ Sit back and enjoy a minute long ???? net session featuring Polly, Boom and Brevis! ????#OneFamily #MumbaiIndians @KieronPollard55 @Jaspritbumrah93 MI TV pic.twitter.com/X0vz7qbHNx
— Mumbai Indians (@mipaltan) March 21, 2022
मुंबई इंडियन्स संघ-
रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमराह (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी), कायरन पोलार्ड (६ कोटी), डेवाल्ड ब्रेविस (३ कोटी), इशान किशन (१५.२५ कोटी), मुरुगन अश्विन (१.६० कोटी), बसिल थंपी (३० लाख), जयदेव उनादकट (७५ लाख), मयंक मार्कंडेय (६५ लाख), संजय यादव (५० लाख), तिलक वर्मा (१.७० कोटी), डेनियल सॅम्स (२.६० कोटी), टायमल मिल्स (१.५० कोटी), जोफ्रा आर्चर (८ कोटी), रिले मेडरिथ (१ कोटी), टिम डेविड (8.25 कोटी), मोहम्मद अरशद खान (२० लाख), आर्यन जुयाल (२० लाख), अर्जुन तेंदुलकर (30 लाख), फॅबियन एलन (75 लाख), अनमोलप्रीत सिंग (20 लाख), रमनदीप सिंग (२० लाख), राहुल (२० लाख) आणि रितिक (२० लाख)
मुंबई इंडियन्स संघाचे संपुर्ण वेळापत्रक-
२७ मार्च- दिल्ली कैपिटल्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
२ एप्रिल- राजस्थान रॉयल्स, डीवाई पाटिल स्टेडियम, मुंबई
६ एप्रिल- कोलकाता नाइट रायडर्स, एमसीए स्टेडियम, पुणे
९ एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर, एमसीए स्टेडियम, पुणे
१३ एप्रिल- पंजाब किंग्स, एमसीए स्टेडियम, पुणे
१६ एप्रिल- लखनऊ सुपर जायंट्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
२१ एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स, डीवाई पाटिल स्टेडियम, मुंबई
२४ एप्रिल- लखनऊ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, मुंबई
३० एप्रिल -राजस्थान रॉयल्स, डीवाई पाटिल स्टेडियम, मुंबई
६ मे – गुजरात टायटन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
९ मे – कोलकाता नाइट रायडर्स, डीवाई पाटिल स्टेडियम, मुंबई
१२ मे – चेन्नई सुपर किंग्स, वानखेडे स्टेडियम, मुंबई
१७ मे- सनराइजर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, मुंबई
२१ मे- दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम, मुंबई.
महत्त्वाच्या बातम्या-
Photo | ‘मिशन आयपीएल’साठी विराट कोहली सज्ज, आरसीबीच्या कँपमध्ये केले आगमन
अगग! शतक करूनही संघाला सामना न जिंकवून देऊ शकणारे क्रिकेटर, पंतचाही समावेश
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा १४ कोटींचा पठ्ठ्या दाखवणार आपला दम? व्हिडिओतून दिले संकेत






