आयपीएलमध्ये मागच्या १४ हंगामांमध्ये अनेक रोमांचक सामने चाहत्यांना पाहायला मिळाले. यादरम्यान अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांनी या स्पर्धेत शतकी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. तर काही फलंदाज असे देखील होते, ज्यांनी सामन्यात शतक केले, पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आयपीएलमध्ये आतापर्यंत जेवढे सामने खेळले गेले, त्यामध्ये सर्वात मोठी खेळी करूनही संघाला विजय मिळवून देता न येणाऱ्या खेळाडूंमध्ये रिषभ पंतचे नाव पहिल्या क्रमांकावर येते.
टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणे ही एक मोठीच गोष्ट असते. अशात जेव्हा एखाद्या फलंदाजाने स्वतःच्या संघासाठी शतक केले, पण तरीही त्यांच्या संघाला पराभव पत्करावा लागला, तर नक्कीच ही खूप निराशेची बाब असते. आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने आयपीएल २०१८ मध्ये संघासाठी १२८ धावांची नाबाद खेळी केली होती. परंतु या सामन्यात त्याच्या संघाला पराभव मिळाला होता. या सामन्यानंतर आयपीएलमध्ये पराभूत झालेल्या सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळणाच्या बाबतीत रिषभ पंतचे नाव पहिल्या क्रमांकावर आले आणि अजूनही त्याचा विक्रम अबाधित आहे.
आयपीएलमध्ये पराभूत झालेल्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम रिषभ पंतच्या नावावर आहे. परंतु पंतव्यतिरिक्तही असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएलच्या मैदानात शतक ठोकले, पण स्वतःच्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आयपीएल स्पर्धेत पराभूत झालेल्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आहे. सॅमसनने ११९ धावा केल्या होत्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. तिसऱ्या क्रमांकावर ११७ धावांची खेळी केलेला एंड्रयू सायमंड्स आहे.
आयपीएलमध्ये पराभूत सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज
नाबाद १२८ धावा – रिषभ पंत
११९ धावा – संजू सॅमसन
नाबाद ११७ धावा – एंड्रयू साइमंड्स
नाबाद ११५ धावा – रिद्धिमान साहा
नाबाद १०६ धावा – शिखर धवन
१०६ धावा – मयंक अग्रवाल
दरम्यान, आयपीएल २०२२ हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आगामी हंगामाचा पहिला सामना खेळला जाईल, जो २६ मार्च रोजी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पार पडेल.
महत्वाच्या बातम्या –
फाफ डू प्लेसिस सर्वात ‘स्वस्त’, तर ‘हा’ खेळाडू बनला आयपीएल १५मधील सर्वात महागडा कर्णधार, घ्या जाणून
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा १४ कोटींचा पठ्ठ्या दाखवणार आपला दम? व्हिडिओतून दिले संकेत
महिला विश्वचषकात भारतासाठी ‘करा किंवा मरा’ सामना; बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय